एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सॅमसंगचा 'मेड इन इंडिया' टॅब लाँच, पाहा किंमत आणि फीचर
मुंबई: सॅमसंगनं भारतात मेड इन इंडिया Galaxy Tab Iris लाँच केला आहे. याची किंमत 13,499 रु. आहे. यामध्ये आधार, एसटीक्यूसी आणि यूआयडीएआय सर्टिफाइड बायोमॅट्रिक ऑथेन्टिकेशन फीचर देण्यात आलं आहे.
हा टॅब Iris रिकॉग्निशन टेक्नोलॉजीवर आधारित आहे. ज्यामध्ये आधार कार्डची माहिती मिळविता येऊ शकते. या टॅबद्वारे बँकिंग आणि ई-गव्हरनेंससारख्या जसं पासपोर्ट, टॅक्स, हेल्थकेअर आणि पेपरलेस सर्विस मिळू शकेल.
या 7 इंच स्क्रीनच्या टॅबलेटमध्ये 1.2Ghz क्वॉड कोअर प्रोसेसरसोबत 1.5GB रॅम आहे. याची इंटरनल मेमरी 8जीबी असून 200 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.
यामध्ये 4 मेगापिक्सल रिअर ऑटोफोकस कॅमेरा देण्यात आला आहे तर याची बॅटरी क्षमता 3,600 mAh आहे. यात ब्ल्यूटूथ, मायक्रो यूएसबी आणि ओटीजी सपोर्ट आहे. यामध्ये ड्यूल आय स्कॅनर असल्याचा कंपनीचा दावा आहे.
हा टॅब कधी उपलब्ध होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
Advertisement