एक्स्प्लोर
Advertisement
लाँचिंगआधीच सॅमसंग Galaxy Note 8 स्मार्टफोनचे फीचर लीक
सॅमसंगचा Galaxy Note 8 हा स्मार्टफोन येत्या काही दिवसातच लाँच होणार आहे. पण त्याआधीच त्या स्मार्टफोनचे फीचर लीक झाले आहेत.
मुंबई : सॅमसंग लवकरच आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी नोट 8 लाँच करणार आहे. 23 ऑगस्टला या स्मार्टफोनचं लाँचिंग होणार असल्याचं समजतं आहे. पण त्याआधीच या स्मार्टफोनचा लूक आणि किंमत लीक झाली आहे.
इव्हान ब्लास याने आपल्या ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, हा गॅलक्सी नोट 8 आहे. त्यासोबत एक लिंकही देण्यात आली आहे. ज्यामध्ये या स्मार्टफोनच्या फीचरबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
लीक माहितीनुसार, गॅलक्सी नोट 8चा लूक हा गॅलक्सी S8 सीरीज सारखाच आहे. यामध्ये मेटल ड्यूल रिअर कॅमेरा दिसून येत आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच स्क्रीन असेल तर याचं रेझ्युलेशन 1440x2960 पिक्सल असेल. असा दावा करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर Exynos 8895 SoC देण्यात आलं असून तब्बल 6 जीबी रॅमही देण्यात आल्याचं या लीक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे कॅमेरा. यामध्ये 12 मेगापिक्सलचा ड्यूल रिअर कॅमेरा असणार आहे. तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. रिपोर्टनुसार, सॅमसंग गॅलक्सी नोट 8 मध्ये 3300 mAh बॅटरी असेल. सॅमसंग Galaxy Note 8 किंमत किती? सॅमसंग गॅलक्सी नोट 8ची किंमत 999 युरो म्हणजेच 76,000 रुपये असू शकते.दरम्यान, ही माहिती नेमकी किती अचूक हे 23 ऑगस्टला समजणार आहेच.Samsung Galaxy Note8: Final specs https://t.co/9DBclqiKWL pic.twitter.com/8yglN2QX6O
— Evan Blass (@evleaks) August 2, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement