Samsung Galaxy F52 5G स्मार्टफोन लॉन्च; 8 जीबी रॅम, 4 कॅमेरा यासारखे खास फीचर्स
सॅमसंग गॅलेक्सी एफ 52 5जी स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा टीएफटी फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिजोल्यूशन 2408x1080 पिक्सल आहे.
Tech News : प्रसिद्ध मोबाईल कंपनी सॅमसंगने आपला नवीन F सीरिज स्मार्टफोन Samsung Galaxy F52 5G बाजारात लॉन्च झाला आहे. सध्या हा फोन चीनमध्ये लान्च झाला आहे. भारतातही या फोनची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. दमदार परफॉर्मन्ससाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि पॉवरसाठी 4500 एमएएच बॅटरी आहे. फोनचे स्पेसिफिकेशन काय असतील याबद्दल जाणून घेऊया.
स्पेसिफिकेशन
सॅमसंग गॅलेक्सी एफ 52 5जी स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा टीएफटी फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा रिजोल्यूशन 2408x1080 पिक्सल आहे. Android 11 बेस्ड वन UI 3.1 ऑपरेटिंग सिस्टमवर फोन काम करतो. फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तर स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबीपर्यंत वाढवला जाऊ शकते.
कॅमेरा
फोटोग्राफीबद्दल बोलायचं तर, सॅमसंग गॅलेक्सी एफ 52 5जी मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. ज्याचा प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड एंगलसह देण्यात आला आहे. 2 मेगापिक्सेलचा थर्ड डेथिंग सेन्सर असून 2 मेगापिक्सलचा चौथा मायक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
सॅमसंग गॅलेक्सी एफ 52 5जी फोनमध्ये पॉवरसाठी 4500 एमएएच बॅटरी आहे, जी 25 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, सॅमसंगसाठी ब्लूटूथ, वाय-फाय, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
इतर संबधित बातम्या
- Moto G60 Launched : 108MP कॅमेरा अन् 6000mAh ची बॅटरी; दमदार फिचर्ससह Moto G60 लॉन्च, किंमत काय?
- Android 12 च्या नवीन फिचर्सचा अनुभव घ्या, या स्मार्टफोनमध्ये इंस्टॉल करा
- Google I/O 2021: स्मार्टफोन वापराचा अनुभव होणार आणखी चांगला; जाणून घ्या गुगलच्या 5 मोठ्या घोषणा
- 'वर्क फ्रॉम होम'मुळे गुगलला मोठ्या प्रमाणात फायदा, एका वर्षात 7400 कोटी रुपयांची बचत