एक्स्प्लोर
जिओकडून 24 रुपये आणि 54 रुपयांचे प्लॅन लाँच
जिओनं ग्राहकांसाठी वेगवेगळे प्लॅन लाँच केले असून अगदी 24 रुपये आणि 54 रुपयांचे प्लॅनही आणले आहेत.
मुंबई : रिलायन्स जिओनं 21 जुलैला आपला जिओ फीचर फोन लाँच केला. त्यासोबतच जिओ फोनसाठी 153 रुपयांचा प्लॅनही लाँच केला. यामध्ये महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंगसह, अनलिमिटेड डेटा मिळणार आहे. यासोबतच कंपनीनं 24 रुपये आणि 54 रुपयांचे दोन नवे प्लॅनही आणले आहेत.
24 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेट डेटा मिळणार आहे तर 54 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक आठवड्यासाठी इंटरनेट डेटा मिळणार आहे.
जिओ फोनसाठी कंपनीनं वेबसाइटवर नोंदणी सुरु केली आहे. या फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.
जिओ फोनमध्ये काय असणार?
जिओच्या या फोनमध्ये 2.4 इंच क्यूव्हीजीए डिस्प्ले असणार आहे. तसेच यामध्ये किबोर्डही देण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये मायक्रो एसडी कार्डही सपोर्ट करेल. ज्यामुळे मल्टीमीडिया फाईल्सही स्टोअर करता येतील.
या फोनची खासियत म्हणजे या फोनमध्ये व्हॉईस कमांड फीचर असणार आहे. व्हॉईस कमांडच्या माध्यमातून तुम्ही मेसेज आणि गुगल सर्चही करु शकता. तसेच या फोनमध्ये जिओ सिनेमा आणि जिओ म्युझिक अॅप असणार आहेत.
या फोनमध्ये एफएम रेडिओशिवाय बेसिक कॅमेराही देण्यात आला आहे. दरम्यान यामध्ये किती मेगापिक्सल असेल याची माहिती अजून समोर आलेली नाही.
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement