एक्स्प्लोर
रेनॉल्ट ट्रायबर कारचं बुकिंग सुरु, 28 ऑगस्टला भारतात लॉंच होणार!
रेनॉल्ट ट्रायबर ही या सीरिजमधील पहिली अशा कार आहे ज्यामध्ये मॉड्युलर सीट्स असणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सीट्ससाठी रेफ्रिजरेटेड स्टोरेज एरिया आणि कपहोल्डर्स देण्यात आले आहेत.
मुंबई: कार लव्हर्ससाठी विशेषत: रेनॉल्ट कार्सच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. रेनो कंपनीने आपल्या आगामी ‘कॉम्पॅक्ट एमपीवी ट्रायबर कार’ची नुकतीच घोषणा केली होती. यासाठीचं बुकिंग 17 ऑगस्टपासून सुरु झालं आहे. भारतात येत्या 28 ऑगस्टला या कारचं लॉंचिंग होणार आहे. या कारची किंमत पाच लाख ते सात लाखपर्यंत असण्याची शक्यता आहे, त्वरित बुकिंग करणाऱ्यांना फक्त 11,000 रुपयात कार बूक करता येत आहे.
रेनॉल्ट ट्रायबर ही या सीरिजमधील पहिली अशा कार आहे ज्यामध्ये मॉड्युलर सीट्स असणार आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या सीट्ससाठी रेफ्रिजरेटेड स्टोरेज एरिया आणि कपहोल्डर्स देण्यात आले आहेत. याच्या दुसऱ्या रो मधील सीट्सना फोल्ड केलं जाऊ शकतं, त्याचसोबत तिसऱ्या रो मधील सीट्स आवश्यकता न असल्यास काढून ठेवण्याचाही पर्याय आहे. गाडीत बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला एसी वेंट मिळणार आहे. या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले कनेक्टीविटी सपोर्ट करणारी 8.0 इंच टचस्क्रीन माहिती, मनोरंजनासाठी इंफोटेनमेंट सिस्टीम, म्युझिकसाठी इन्स्ट्रुमेंट कल्स्टर आणि एलईडी इंडिकेशनसारखे फिचर्सही अनुभवायला मिळणार आहेत.
रेनॉल्ट ट्रायबर फक्त पेट्रोल इंजिन कार असणार आहे, यामध्ये 1.0 लीटरचे तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन उपलब्ध असणार आहे, जे जवळजवळ 72 पीएसची पॉवर आणि 96 एनएमा टॉर्क (चक्राकार गती निर्माण करणारं यंत्र) असणार आहे. इंजिनसोबत फाईव्ह-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्स असेल. रेनो ट्रायबरच्या बुकिंगसाठी तुम्ही रेनॉल्ट कार्सच्या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा डिलर्सशी संपर्क साधू शकता.
काय आहेत रेनॉल्ट ट्रायबरची वैशिष्ट्ये?
एकूण 100 हून अधिक विविध सीट-कॉन्फिगरेशन्स, इझीफिक्स सीट्स यंत्रणा
चार एमचे प्रशस्त केबिन, 625 एल बूट स्पेस आणि 31 एल पर्यंतची इंटरनल स्टोरेज स्पेस
20.32 ( आठ इंच) मल्टीमीडिया टच स्क्रीन
1.0 लीटरचे पेट्रोल इंजिन, कमी वाहन देखभाल खर्च
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
भारत
बीड
Advertisement