एक्स्प्लोर
रेनॉल्ट लॉजीची वर्ल्ड एडिशन लॉन्च
दिल्ली : फ्रेंच कारनिर्माता कंपनी रेनॉल्टने नुकतीच आपली लॉजीची वर्ल्ड एडिशन लॉन्च केली आहे. लॉजी ही रेनॉल्टची मल्टी परपज व्हेईकल आहे. या कारमध्ये 85PS आणि 110PS दोन इंजिन पर्याय उपलब्ध असतील.
या कारमध्ये रेनॉल्टने दावा केलेले 25 नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. या नवीन बदलांमुळे एक्सटिरिअर आणि इंटिरिअरला फायदेशीर असेल. या गाडीची किंमत 9.74 लाखांपासून 10.40 लाखांपर्यंत आहे.
भारतातील रस्त्यांच्या अनुषंगाने या गाडीची निर्मिती करण्यात आली असून फेअरी रेड, रॉयल ऑर्किड, पर्ल व्हाईट आणि मुनलाईट सिल्वर या रंगामध्ये उपलब्ध असेल.
या गाडीच्या बाह्यभागाचा विचार करता क्रोम सॅटीन गार्निश असलेले फॉग लँप, 2 टोन एरोडायनॅमिक बंपर, R15 नेप्टा फिनीश अलोय व्हीलसोबत अनेक नवीन फिचर्स असतील. तसेच याचे मायलेजही जवळपास 20किमी प्रतिलिटर असेल.
या कारसोबत रेनॉल्टने 3केअर मेंटेनंस पॅकेज दिलं आहे. 3 वर्षांपर्यंत किंवा 60 हजार किमीपर्यंतच्या या पॅकेजसाठी ग्राहकांना 22,142 रूपये मोजावे लागणार आहेत.
या गाडीची काही ठळक वैशिष्ट्ये
- चार नव्या आकर्षक रंगात
- किंमत 9.74 लाखांपासून 10.40 लाखांपर्यंत
- एवरेज जवळपास 20किमी प्रतिलिटर
- 1.5 लीटर डीसीआय डीझेल इंजिन
- आपल्या श्रेणीतील उत्कृष्ट मायलेज
- 6 स्पीड मॅन्युअल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement