एक्स्प्लोर
Advertisement
जिओ फोनची प्री बुकिंग थांबवली!
प्री बुकिंग थांबवण्यात आली असली तरी लवकरच पुन्हा एकदा प्री बुकिंग सुरु केली जाईल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे.
मुंबई : रिलायन्सच्या जिओ फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टला सुरु झाली. मात्र काही वेळातच फोनच्या बुकिंगला जास्त प्रतिसाद मिळाल्याने जिओची वेबसाईट क्रॅश झाली. त्यानंतर काही वेळाने पुन्हा वेबसाईट सुरु करण्यात आली. पण अजूनही अनेकांनी फोन बूक केलेला नाही.
तुम्हीला जिओ फोन खरेदी करायचा आहे आणि तुम्ही अजून प्री बुकिंग केली नसेल, तर तुमच्यासाठी निराशाजनक बातमी आहे. कारण जिओने फोनची प्री बुकिंग थांबवली आहे.
जिओच्या वेबसाईटवरुन प्री बुकिंगचा पर्याय हटवण्यात आला आहे. जेव्हा पुन्हा एकदा बुंकिंग सुरु केली जाईल तेव्हा ग्राहकांना कळवण्यात येईल, असं जिओने म्हटलं आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पुन्हा एकदा बुकिंग सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.
प्री बुकिंग थांबवण्यात आली असली तरी लवकरच पुन्हा एकदा प्री बुकिंग सुरु केली जाईल, असंही कंपनीने स्पष्ट केलं आहे. मात्र पुढील प्री बुकिंगची तारीख देण्यात आलेली नाही. लाखोंच्या संख्येमध्ये जिओ फोनची बुकिंग झाल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हा आता केवळ नोंदणी करु शकता.
रिलायन्सने जिओ फोनची किंमत 0 रुपये ठेवली आहे. मात्र अनामत रक्कम म्हणून तुम्हाला 1500 रुपये द्यावे लागतील, जे तीन वर्षांनी परत मिळतील. फोन बूक करताना 500 रुपये द्यावे लागतील, तर उर्वरित 1 हजार रुपये फोन हातात पडल्यानंतर द्यायचे आहेत.
या फोनमध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी 153 रुपयांमध्ये अनलिमिटेड मोफत व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड 4G डेटा मिळणार आहे. जिओ फोनची विशेषता म्हणजे एक जिओ फोन यूझर तीन वर्ष एक फोन वापरु शकतो आणि फोन जमा करुन 1500 रुपये परत घेऊ शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
रत्नागिरी
नाशिक
क्राईम
Advertisement