एक्स्प्लोर
जिओ यूजर्सना आता मिळणार अनलिमिटेड डेटा
यूझर्सना त्वरित आकर्षित करणाऱ्या ऑफर्स जिओने बाजारात आणल्या. त्यामुळे कमी कालावधीत स्मार्टफोन वापरणारा एक मोठा वर्ग जिओकडे वळला.
मुंबई : रिलायन्स जिओने वर्षपूर्तीनिमित्त आता ऑफर आणण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात सध्या सुरु असलेल्या 149 रुपयांच्या रिचार्जमध्ये काही बदल करुन करण्यात आली आहे.
जिओच्या 149 रुपयांच्या रिचार्जमध्ये 2 जीबी 4G इंटरनेट डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 एसएमएस आणि मोबाईल अॅप अॅक्सेस मिळतं. मात्र 2 जीबी इंटरनेट डेटा संपल्यानंतरही नेट बंद होणार नाही. तर 64kbps स्पीडने इंटरनेट सुरुच ठेवले जाईल. त्यामुळे यूजर्सच्या इंटरनेट सर्फिंगमध्ये अडथळा येणार नाही.
खरंतर जिओने हे बदल करुन नव्याने काही आणलंय, असं म्हणता येणार नाही. कारण इतर काही टेलिकॉम कंपन्यांनी याआधीच अशाप्रकारची ऑफर अंमलात आणलीय. मात्र जिओ यूजर्सचा विचार करता, त्यांच्यासाठी नक्कीच खुशखबर म्हणता येईल.
रिलायन्स जिओने गेल्या एक वर्षात अनेक टेलिकॉम कंपन्यांना मोठ-मोठे धक्के दिले आहेत. यूजर्सना त्वरित आकर्षित करणाऱ्या ऑफर्स जिओने बाजारात आणल्या. त्यामुळे कमी कालावधीत स्मार्टफोन वापरणारा एक मोठा वर्ग जिओकडे वळला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement