एक्स्प्लोर
रिलायन्स जिओच्या ग्राहकाला तब्बल 27 हजार रुपये बिल
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ मोफत सेवेमुळे देशभर चर्चेत आहे. मात्र जिओ सध्या एक वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. कारण जिओच्या एका ग्राहकाला तब्बल 27 हजार 718 रुपये बिल आलं आहे.
मोफत वापर केलेली सेवा आता जिओ अशा पद्धतीने वसूल करणार का, असा सवाल सोशल मीडियातून केला जात आहे. अयुनुद्दीन मोंडल असं संबंधित ग्राहकाचं नाव असून त्याने 554 जीबी डेटा वापरल्याचं बिलामध्ये म्हटलं आहे.
रिलायन्स जिओचं स्पष्टीकरण
दरम्यान कंपनीने तातडीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. जिओ ही मोफत सेवा आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बिल आकारलं जाणार नाही. हे बनावट बिल असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. याप्रकरणी कोलकात्यातून एकाला अटक करण्यात आली असल्याची माहितीही कंपनीने दिली.
सोशल मीडियावर या बिलाचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर जिओ युझर्समध्ये एकच संभ्रम उडाला. मात्र जिओने स्पष्टीकरण दिल्यानंतर ग्राहकांनी निःश्वास सोडला.
... तर एक हजार रुपये दंड
या बनावट बिलामध्ये 20 नोव्हेंबर ही बिल भरण्याची शवेटची तारीख आहे. या कालावधीत बिल न भरल्यास 1 हजार 100 रुपये दंड आणि मूळ बिल अशी 28 हजार 818 रुपये रक्कम भरावी लागेल, असंही म्हटलं आहे.
काय आहे जिओ ऑफर?
रिलायन्स जिओने 90 दिवसांसाठी मोफत 4 जी सेवा दिली आहे. 4 जी फोन असणाऱ्या ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये मोफत व्हिडिओ, व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड डेटा अशी सेवा देण्यात आली आहे. 31 डिसेंबरला ही ऑफर संपणार असून त्यानंतर पैसे आकारले जाणार आहेत.
संबंधित बातमी : अनिल अंबानींची रिलायन्स जिओला टक्कर, CDMA ची खास ऑफर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement