एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिओचा फीचर फोन लवकरच बाजारात: रिपोर्ट
मुंबई: रिलायन्स जिओनं भारतीय मोबइल फोन इंटरनेट जगतात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. टेलिकॉमनंतर रिलायन्स जिओनं आता अनेक नव्या प्रोडक्ट आणि सेवांवर काम सुरु केलं आहे. कंपनी लवकरच 4G VoLTE फीचर फोन आणणार असल्याची चर्चा सुरु आहे.
91Mobiles च्या रिपोर्टनुसार, जिओच्या या फीचर फोनचं उत्पादन सुरु झालं असून लवकरच हा फोन बाजारात उपलब्ध असेल. या रिपोर्टमध्ये जिओच्या या फोनचे फीचरही देण्यात आले आहेत. ज्यानुसार, या फोनची स्क्रीन 2.4 इंच आहे. याच्या प्रोसेसर कंपनीनं क्वॉलकॉम आणि स्प्रेडट्रमशी करार केला आहे.
याशिवाय या जिओ फिचर फोनमध्ये दोन मॉडेल येतील. दोन्ही मॉडेल 512 एमबी रॅम आणि 4 जीबी इंटरनल मेमरी असणार आहे. तसेच एसडी कार्डच्या मदतीनं मेमरी वाढवता येणार आहे. तसेच यामध्ये 2 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर VGA फ्रंट फेसिंग कॅमेरा असेल.
यामध्ये जिओ अॅप प्रीलोडेट असेल. याची खासियत म्हणजे हा फोन NFC कनेक्टिव्हिटी आणि वाय-फायही सपोर्ट करेल. तसेच यामध्ये जीपीएस सपोर्टिव्ह असेल.
यूजर्सच्या गरजा लक्षात घेऊन हा फीचर फोन तयार करण्यात येत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या रिपोर्टनुसार या स्मार्टफोनची किंमत 1500 रुपये असू शकते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement