एक्स्प्लोर
Advertisement
अनिल अंबानींची रिलायन्स जिओला टक्कर, CDMA ची खास ऑफर
नवी दिल्ली : रिलायन्स जिओच्या अनलिमिटेड 4G ऑफरनंतर सर्वच टेलिकॉम कंपन्यांनी डेटा पॅकच्या दरात कपात केली. मात्र आता रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांचे भाऊ अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशनने जिओला टक्कर देणारी ऑफर आणली आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनने (CDMA) अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची ऑफर आणली आहे. 149 रुपयांत देशभरात अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. याशिवाय या ऑफरमध्ये 300 MB डेटा सुद्धा मिळणार आहे.
रिलायन्स कम्युनिकेशनचा हा प्लॅन ग्राहकांना जिओपेक्षा परवडणारा असल्याचं बोललं जात आहे. कारण यासाठी 4G फोनची कसलीही अट नाही. कोणत्याही फोनवर या ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
रिलायन्स जिओने 31 डिसेंबरपर्यंत अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, 4 G डेटाची ऑफर दिली आहे. देशभरात जिओ सिम मोठ्या प्रमाणात वितरीत करण्यात आली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
Advertisement