एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Reliance AGM 2019 : 5 सप्टेंबर पासून गिगा फायबर इंटरनेट सेवा लाँच होणार, घरात बसून चित्रपट पाहता येणार
या सेवेत आता ग्राहक चित्रपट रिलीज होताच त्याचं दिवशी घरी बसून आपला आवडता चित्रपट पाहता येणार आहे. जिओने या सेवेला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' असे नाव दिले आहे.
मुंबई : रिलायन्स जीओच्या बहुप्रतिक्षित गिगा फायबर इंटरनेट सेवेची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. येत्या 5 सप्टेंबर पासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. रिलायन्स जीओच्या 42 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी आज ही घोषणा केली. या सेवेत आता ग्राहक चित्रपट रिलीज होताच त्याचं दिवशी घरी बसून आपला आवडता चित्रपट पाहता येणार आहे. जिओने या सेवेला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' असे नाव दिले आहे. इतकेच नाही तर 'जिओ गीगा फायबर' मध्ये मल्टी-पार्टी व्हिडीओ कॉन्फरन्स कॉल, लाइव्ह गेमिंग आणि स्मार्ट होम सोल्यूशन सारख्या सुविधा देखील दिल्या आहेत. यावेळी जीओच्या सेट टॉप बॉक्स ची देखील घोषणा करण्यात आली असून गीगा फायबर सेवेमध्येच त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. यासोबतच जियो कडून मोफत लँडलाईन कनेक्शन देखील देण्यात येणार आहे.
जीओच्या मोबाईल इंटरनेट सेवेची तीन वर्षापूर्वी सुरुवात करण्यात आल्यानंतर देशभरात एक प्रकारे इंटरनेट क्रांती घडून आल्याचं पाहायला मिळालं. या सेवेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून जीओच्या ब्रॉडबँड इंटरनेट सेवेबद्दल लोकांमध्ये उत्सुकता होती. गेल्या वर्षभरापासून भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये या सेवेची चाचणी सुरू होती. देशातील जवळपास 5 लाख घरांमध्ये या सेवेची जोडणी देण्यात आली होती, अशी माहिती मुकेश अंबानी यांनी बोलताना दिली.
जिओची ही गीगा फायबर इंटरनेट सेवा येत्या 5 सप्टेंबर पासून अधिकृतपणे सुरू होणार आहे. पुढच्या 1 वर्षात देशभरात या सेवेचं जाळं पसरवण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये?
जीओच्या या गीगा फायबर ब्रॉडबँड इंटरनेट सेवेत ग्राहकांनी 100 एम बी पी एस पासून 1 जी वी पी एस पर्यंतचा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. यासाठी 700 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंतचे प्लॅन असणार आहेत. ब्रॉडबँड कनेक्शन सोबतच सेट टॉप बॉक्स मिळणार असून ज्याद्वारे टिव्ही चॅनल, गेमिंग, Virtual Reality सारख्या अनेक गोष्टींचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे.
जियो कडून ऑनलाईन स्ट्रीमींग सेवा देणाऱ्या काही OTT प्लॅटफॉर्म सोबत भागीदारी केली जाणार असून त्यावरील कंटेंट देखील गीगा फायबर सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत पाहता येणार आहे.
प्रिमिअम ग्राहकांसाठी फर्स्ट डे फर्स्ट शो
त्यासोबतच गीगा फायबर ची प्रिमिअम सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना काही विशेष फायदे मिळणार आहेत. थिएटर मध्ये प्रदर्शित होणारा सिनेमा त्याचं दिवशी या ग्राहकांना टीव्ही वर पाहता येणार आहे.
वेलकम ऑफर मध्ये मोफत टीव्ही
जियो गीगा फायबर ची घोषणा करताना मुकेश अंबानी यांनी एका वेलकम ऑफरची घोषणा केली आहे. यामध्ये गीगा फायबर वेलकम ऑफरमध्ये वार्षिक जोडणी घेणाऱ्या ग्राहकांनी मोफत एचडी किंवा 4k एल ई डी टीव्ही आणि 4k सेट टॉप बॉक्स मोफत दिला जाणार आहे.
यासोबतच गीगा फायबर सेवेचा वापर करून देशभरातील मोबाईल आणि लँडलाईन फोनवर मोफत व्हॉईस कॉल करता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी देखील यावेळी विशेष पॅक ची माहिती देण्यात आली.जिओकेडून अमेरिका आणि कॅनडा येथे करण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल कॉल्स 500 रु. प्रतीमहिना पॅकची घोषणा करण्यात आली ज्यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स करता येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
क्रिकेट
Advertisement