एक्स्प्लोर

Flipkart Sale: Realme X7 Max वर मिळतेय 8 हजारांची सूट

Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीच्या म्हणण्यानुसार फोनची बॅटरी फक्त 16 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.

Tech News : आजपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर Big Saving Days सेल सुरू झाला आहे. 16 जूनपर्यंत सुरू असलेल्या या सेलमध्ये अनेक बड्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर सूट देण्यात येत आहे. जर आपण विक्रीच्या सर्वात चांगल्या डीलबद्दल बोलायचं तर Realme X7 Max 5G वर एक चांगली ऑफर दिली जात आहे. फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेडअंतर्गत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजचा फोन फक्त 18,910 रुपयांमध्ये मिळू शकतो. या फोनची किंमत लॉन्चच्या वेळी 26,999 रुपये होती. फोनवर आठ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

स्पेशिफिकेशन 

Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी UI 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोनची मेमरी आपण मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकतो.

कॅमेरा

फोटोग्राफीबद्दल सांगायचे तर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप Realme X7 Max 5G फोनमध्ये देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा सोनी आयएमएक्स 682 सह 64 मेगापिक्सलचा आहे. तर 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल लेन्स देण्यात आला आहे. तर 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

4500mAh बॅटरी

Realme X7 Max 5G स्मार्टफोनमध्ये पॉवरसाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 50W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीच्या म्हणण्यानुसार फोनची बॅटरी फक्त 16 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये 5 जी, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट अशी सुविधा देण्यात आली आहे.

Realme X7 Max 5G ची Vivo V20 Pro शी स्पर्धा 

Vivo V20 Pro हा स्मार्टफोन 29,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह सिंगल व्हेरिएंट असेल. यात 6.44 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 765 जी प्रोसेसर आणि Android 11 वर कार्य करतो. मेमरी कार्डद्वारे याची मेमरी वाढवता येते. फोनमध्ये 4000 mAh ची बॅटरी आहे. या मोबाईलमध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. यात प्रायमरी सेन्सर 64 मेगापिक्सल, दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सल, तिसरा 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि फ्रंटसाठी कॅमेऱ्यासाठी ड्युअल सेन्सर आहे. ज्यामध्ये पहिला सेन्सर 44 मेगापिक्सलचा आणि दुसरा सेन्सर 8 मेगापिक्सलचा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

GST on Smart phones: स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
स्मार्टफोनवरील जीएसटी कमी होणार? हँडसेट स्वस्त होण्याची शक्यता; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या निर्णयाकडे नजरा
Meta News : फेसबुक- इन्स्टाग्राम मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
फेसबुक- इन्स्टा मध्यरात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत बंद राहणार, मेटाचा मोठा निर्णय; नाईट शटडाऊनची चाचणी सुरु, नेमकं प्रकरण काय?
4G Solar Camera For Farm : शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
शेताच्या राखणीसाठी कोणता CCTV सर्वात चांगला? वीज आणि वाय-फायशिवाय मोबाईलवर लाईव्ह फुटेज
How To Check TV Remote Problem: टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!
टीव्हीचा रिमोट खराब झालाय की बॅटरी संपली?; मोबाईल कॅमेऱ्याच्या मदतीने 10 सेकंदात करा Check!

व्हिडीओ

Mohan Bhagwat on Muslim Statment : भारतात एकही मुस्लीम नको म्हणणारा हिंदू नाही Special Report
Nepal flood : घर असावं तर असं! नेपाल महापुरातही सुरक्षित Special Report
Sangli Ganpati Lezim : बाप्पाच्या स्वागताला लेझीमचा ताल, परंपरेचा ठेका | Special Report ABP Majha
Sanjay jadhav Speech Parbhani : मनोज जरांगेंवर भाष्य, माझ्यावर बोलायचा तुमचा नैतिक अधिकार
Shankar Abhyankar Majha Katta : लक्ष्मण रेषा ते रावणाची भक्ती, किती तथ्य, किती मिथ्य? दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Sharma : 6 चौकार 7 षटकार, अभिषेक शर्माची शेर ए पंजाब टी 20 लीगमध्ये तुफान फटकेबाजी, 26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी
6 चौकार 7 षटकार,26 बॉलमध्ये 77 धावांची खेळी, अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी 
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान, 3 कंपन्या फायद्यात
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांना फटका, 1.13 लाख कोटी बुडाले, रिलायन्स आणि एअरटेलचं सर्वाधिक नुकसान
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
ह्रदयद्रावक... मुंबईतील 60 पर्यटक नेपाळमधील 'त्या' इमारतीच्या ढिगाऱ्यात दबल्याची शंका; नेपाळ सरकारनं काय म्हटलं?
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
पुण्यातील गणेशोत्सव, एका संस्थेनं गौतमी पाटीलला बोलावलंय, धांगडधिंगा उपयोगाचा नाही; मेधा कुलकर्णींचा संताप
Kaas Flower Festival : कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज,मंडपघळसह नवे पॉइंट्स विकसित
कास पठारावर 1 सप्टेंबरपासून फुलोत्सवाची रंगत; पर्यटकांच्या स्वागतासाठी पठार सज्ज
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
मन हेलावणारी घटना; आई-वडिलांसह पर्यटनास गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा तानसा नदीपात्रात बुडून मृत्यू
Home Loan : गृहकर्ज स्वस्त झालं, घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याजदर
घर खरेदीसाठी 7 टक्के व्याज दरावर बँकाकडून कर्जवाटप, जाणून घ्या बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
श्रीलंकेला तगडा धक्का, आयसीसीनं पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा हक्क काढून घेतला; सरकारी हस्तक्षेपाचा आरोप
Embed widget