एक्स्प्लोर
Advertisement
अँड्रॉईड यूझर्ससाठी खुशखबर! ‘PRISMA’ अॅप आता प्ले स्टोअरवर
मुंबई : अँड्रॉईड यूझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या ‘प्रिझ्मा’ अॅप आता गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत केवळ अॅपल यूझर्स हे अॅप वापरु शकत होते.
अँड्रॉईड यूझर्सही आपल्या गूगल प्ले स्टोअरवरुन प्रिझ्मा अॅप डाऊनलोड करु शकतात. 7 एमबीचं हे अॅप्लिकेशन अँड्रॉईडच्या ‘किटकॅट’ आणि त्याहून अपडेटेड व्हर्जन सपोर्टिव्ह असेल.
पेंटिगसारख्या इफेक्टमुळे कमी कालावधीतच टेक्नोसॅव्हींमध्ये प्रिझ्मा अॅप प्रचंड प्रसिद्ध झालं होतं. याआधी केवळ अॅपल यूझर्ससाठी उपलब्ध असणारं हे अॅप आता गूगल प्ले स्टोअरवरही उपलब्ध असेल.
‘PRISMA’ अॅपचे फीचर्स काय आहेत?
पिझ्मा इतर एडिटिंग अॅपहून वेगळं असण्याचं कारण म्हणजे, एडिटिंगसाठी सर्वसाधारण फिल्टरचा वापर न करता, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स एल्गोरिदमच्या मदतीने फोटो एडिट करु शकतो. फोटो कॅप्चर केल्यानंतर हे अॅप पेटिंगनुसार एडिट करतं. एडिटनंतर तुमचा फोटो ऑईल पेंटिंगसारखं दिसतं. प्रिझ्मा अॅपमध्ये जवळपास 26 इफेक्ट्स असून, फोटोंना आर्टिफिशियल इंटेलिजेन्सने एडिट केलं जातं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement