एक्स्प्लोर
Advertisement
153 किमी प्रवास, दोन आठवड्यात सर्व पॉकिमॉन खिशात
न्यूयॉर्क : पोकिमॉन गो या खेळाने आतापर्यंत जगभरातल्या अनेकांना वेड लावलं आहे. या खेळात पोकिमॉन पकडण्यासाठी सध्याची तरुणाई अक्षरशः मोबाईलमध्ये डोकं टाकून बसलेली असते. याच वेडापायी अमेरिकेतल्या जॉन्सन या तरुणाने 153 किलोमीटरचा प्रवास करत सर्व पोकेमॉन पकडले आहेत.
घरातून निघाल्यापासून ऑफिसला पोहचेपर्यंत जॉनसर हा केवळ पोकेमॉन हा गेमच खेळत असायचा. या वेडापायी जॉन्सनने 153 किलोमीटरचा प्रवासही केला आहे. अमेरिकेच्या परिघात येणारे सगळे पोकिमॉन पकडले आहेत. ही कामगिरी करणारा तो सध्याच्या घडीला एकमेव व्यक्ती असल्याचं म्हटलं जात आहे.
विशेष म्हणजे जॉन्सन हा कोणी मोकळा वेळ असलेला टीनएजर नसून 28 वर्षांचा इंजिनिअर आहे. जॉन्सन हा 'अॅप्लिको ब्रुकलिन' नावाच्या टेक कंपनीमध्ये नोकरी करतो. जॉन्सन आठवड्याचे 50 तास बिझी असतो, मात्र यामुळे पोकिमॉनच्या खेळात कधी व्यत्यय नाही आला.
जॉन्सनच्या हाती आतापर्यंत 4 हजार 629 पोकिमॉन लागले असून 31 वी लेव्हल पार केली आहे. तो रोज ऑफिसला जातो आणि संध्याकाळी सहा नंतर पोकिमॉनच्या शोधाला लागतो. त्यामुळे इच्छा तिथे पॉकिमॉन या उक्तीचा पुरेपूर प्रत्यय जॉन्सनच्या बाबतीत येताना दिसतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement