(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5000 mAh बॅटरी आणि 32 GB, लॉन्च झाला या वर्षातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन; किंमत फक्त 6500
Poco C50 to launch in India: नवीन वर्षाच्या निमित्ताने मोबाईल फोन कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. दरम्यान, Poco ने आज या वर्षातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Poco C50 to launch in India: नवीन वर्षाच्या निमित्ताने मोबाईल फोन कंपन्या आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. दरम्यान, Poco ने आज या वर्षातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Poco ने हा मोबाईल फोन 2 स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 10 जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Poco ने C सीरीज अंतर्गत आज Poco c50 लॉन्च केला आहे. कंपनीने हा मोबाईल फोन 2GB आणि 3GB रॅम अशा दोन रॅम पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. दोन्ही प्रकारांमध्ये ग्राहकांना 32GB इंटरनल मेमरी मिळेल. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर MediaTek Helio A22 चिपसेटद्वारे समर्थित आहे. या मोबाईलची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊ..
Poco C50 किंमत
Poco C50 10 जानेवारीपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज सह Poco C50 च्या व्हेरिएंटची किंमत 6,499 रुपये आहे तर त्याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे. कंट्री ग्रीन आणि रॉयल ब्लू या दोन रंगांमध्ये तुम्ही हा मोबाईल फोन खरेदी करू शकाल.
Poco C50 मध्ये ग्राहकांना 6.50-इंचाचा डिस्प्ले मिळेल. जो 60hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये MediaTek Helio A22 प्रोसेसर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे. जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेर्याबद्दल बोलायचे झाले तर मोबाईल फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. यासोबत आणखी एक सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
Upcoming Smartphones 2023: हे फोन ही लवकरच होणार भारतात लॉन्च
Poco व्यतिरिक्त Redmi Note 12 सीरीज 5 जानेवारीला लॉन्च होणार आहे. यानंतर 10 जानेवारीला IQ00 11 सीरीज लॉन्च होईल. त्यानंतर 18 जानेवारी रोजी पोकोचा दुसरा स्मार्टफोन X5 GT बाजारात दाखल होईल. 31 जानेवारी रोजी, Vivo अधिकृतपणे आपला Vivo x90 5G स्मार्टफोन सादर करेल.
इतर बातम्या: