एक्स्प्लोर
'पोकेमॉन गो'मधील अंड्यांना आक्षेप, हायकोर्टाची सरकारला नोटीस
गांधीनगर : अल्पावधित लोकप्रिय ठरलेला मोबाईल गेम पोकेमॉन गो अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण या गेममुळे हिंदूंच्या भावाना दुखावत असल्याची जनहित याचिका, गुजरात हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे हायकोर्टाने ही याचिका दाखल करुन घेत, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे.
153 किमी प्रवास, दोन आठवड्यात सर्व पॉकिमॉन खिशात
काय आहे प्रकरण? पोकेमॉन गो या गेममध्ये अनेक धार्मिक स्थळं दाखवली आहेत. मात्र या धार्मिक स्थळांमध्ये पॉईंट्ससाठी अंडी दाखवली आहेत. धार्मिक स्थळं पवित्र आहेत. याठिकाणी अंडी दाखवल्याने हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या गेमवर बंदी आणा, अशी याचिका हायकोर्टात करण्यात आली. अनिल दवे यांनी ही याचिका केली आहे. त्यांच्या मते अंडे हे मांसप्रकारात मोडतं. त्यामुळे मंदिरांसारख्या पवित्र ठिकाणी अंडी दाखवणे योग्य नाही. अनिल दवे यांचे वकील नचिकेत दवे यांच्या दाव्यानुसार, पोकेमॉन गेममध्ये पॉईंट म्हणून अंडी दिली जातात. विविध धर्माच्या मंदिरात ही अंडी दाखवली आहेत. मात्र हिंदू आणि जैन मंदिरात अंडी दाखवणे चुकीचं आहे. त्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कोर्टाकडून सरकारला नोटीस या याचिकेवरील सुनावणीदरम्यान, गुजरात हायकोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला तसेच अमेरिकन डेव्हलपर कंपनी Niantic Inc ला नोटीस पाठवली आहे. संबंधित बातम्या Pokémon GO खेळताना महिलेसोबत घडली विचित्र घटना पोकीमॉन गो गेमने जगभरातील तरुणाई 'सैराट' पोकेमॉन गो खेळणाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद पोकेमॉन गो रस्त्यांवर खेळण्यास पोलिसांकडून बंदीची शक्यता 153 किमी प्रवास, दोन आठवड्यात सर्व पॉकिमॉन खिशातअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement