एक्स्प्लोर

पेटीएमची पेमेंट बँक लॉन्च, खात्यावरील रकमेवर 4 टक्के व्याज

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या कॅशलेस इंडियाच्या नाऱ्यानंतर संपूर्ण देशात आपले पाय घट्ट रोवणाऱ्या पेटीएमने काल आपली पेमेंट बँक लॉन्च केली आहे. कंपनीचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी ट्वीट करुन याची माहीती दिली. या नव्या सेवेत पेमेंट बँकेतील जमा रकमेवर खातेदारांना 4 टक्के व्याज मिळणार आहे. रिझर्व बँकेकडून पेटीएमला पेमेंट बँकेचा परवाना नुकता मिळाला असून, यानुसार पेटीएमने ही नवी सेवा सुरु केली. या बँकिंग सेवेच्या माध्यमातून कंपनी 31 ब्रांच आणि 3000 कस्टमर पाईंट सुरु करणार आहे. पेटीएमने ही सेवा सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु केली असून, याचा वापर कंपनीचे कर्मचारी आणि काही निवडक व्यक्तींनाच याचा वापर करता येणार आहे. जर पेटीएम यूजर्सना ही सेवा वापरायची असल्यास, त्यांना त्यांच्या पेटीएमवरुन इनव्हीटेशन रिक्वेस्ट पाठवावी लागेल. पेटीएम पेमेंट बँकेची वैशिष्ट्ये या नव्या बँकेसाठी पेटीएम यूजर्सच पेमेंट बँकेचे खातेदार असणार आहे. पेटीएम यूजर्सचं ई-वॉलेट त्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर होईल. जर तुम्हाला पेटीएम बँक अकाऊंटची सेवा नको असल्यास, तर तुम्ही payment.com/care किंवा help@paytm.com वरुन पेटीएमला याबाबत कळवू शकता. यानंतरही पेमेंट बँकेशिवायही तुम्ही तुमच्याच वॉलेटवरुन व्यवहार करु शकता. विशेष म्हणजे, तुम्हाला तुमच्या खात्यावर कमीत-कमी किती पैसे ठेवावे, याचं कोणतंही बंधन नाही. म्हणजे, जर तुमच्या खात्यावर शून्य बँलेन्स असला, तरी त्यावर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. तसेच NEFT आणि RTGS साठीही कसलंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. तसेच पेटीएम आपल्या पेमेंट बँक यूजर्सना Rupay डेबिट कार्ड देणार आहे. ज्यासाठी कंपनी वार्षिक 100 रुपये आणि डिलिव्हरी चार्जेस घेईल. पण कार्ड हारवल्यास यूजर्सना 100 रुपये द्यावे लागतील. दरम्यान, या आधी ही सेवा एअरटेलनेही सुरु केली होती. एअरटेलने आपल्या पेमेंट बँकेतील बचत खात्यावर 7.25 टक्के दराने व्याज दिले आहे. पण पेटीएमने सुरु केलेल्या सेवेत 4 टक्केच व्याज मिळणार आहे. संबंधित बातम्या एअरटेल पेमेंट बँकेत बचत खात्यावर 7.25 टक्के व्याज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोनSaif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked: पोलिसांना पहिला क्लू सापडला, चोर कोणत्या मार्गाने सैफ अली खानच्या घरात शिरला, प्रायमरी थिअरीतला अंदाज काय?
सैफ अली खानच्या बिल्डिंगच्या मागे तुटलेली जाळी दिसताच पोलिसांच्या डोक्यातली चक्रं फिरली, पहिला क्लू सापडला?
Nashik News : नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
नाशिकमधील गुरव आत्महत्येचं कोडं उलगडणार, पोलीस तपासाला गती, समोर आली मोठी माहिती
Sanjay Raut : हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
हा तर नरेंद्र मोदींना धक्का, सैफ अली खानच्या हल्ल्यावरून राऊत संतापले; म्हणाले, पद्मश्री किताब असलेलाही...
Dhananjay Munde: राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
राज्य मंत्रिमंडळाची बैठक, पण धनंजय मुंडे परळीतच; वाल्मिक कराड फसल्याने धनुभाऊंची पुरती कोंडी
Saif Ali Khan Attacked: तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं
करिना अन् लहानग्या मुलांच्या सुरक्षेसाठी सैफ चोराला भिडला, पाठीत वार झाला पण शेवटपर्यंत लढला
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack : वांद्रेतील तीन घटनांचा उल्लेख, मुंबईत दहशतीचा प्रयत्न, सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर प्रियांका चतुर्वेदी काय म्हणाल्या?
सर्व घटना वांद्रेमध्येच का? सैफ अली खानवर हल्ला हा मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रकार : प्रियांका चतुर्वेदी
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
मोठी बातमी! विष्णू चाटेची रवानगी लातूरच्या कारागृहात, संतोष देशमुख हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट, कोणापासून धोका? 
Embed widget