एक्स्प्लोर

दोन मिनीटात दोन लाखांचं कर्ज देणार पेटीएम, 18 ते 36 महिन्यांचा असेल EMI

पेटीएमच्या या कर्जाची प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल स्वरुपात असेल, यासाठी कोणत्याही कागदी प्रक्रियेची गरज नसणार आहे.या व्यक्तिगत कर्जाच्या परताव्यासाठी 18 ते 36 महिन्यांच्या कालावधीचा EMI पर्याय उपलब्ध असेल.

नवी दिल्ली: आता पर्यंत पेटीएमचा वापर खरेदीसाठी किंवी पेमेंटच्या ट्रान्सफरसाठी करण्यात येत होता. पण आता पेटीएमने आपल्या सेवेत विस्तार केला असून त्याद्वारे केवळ दोन मिनीटात दोन लाखांपर्यंतचे व्यक्तिगत कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे पेटीएमची ही सेवा वर्षातील 365 दिवस आणि 24 तास सुरु राहणार आहे.

जर आपल्याला रविवारी किंवा सणाच्या काळात कर्ज हवं असेल तर त्याची चिंता पेटीएमने दूर केली आहे. त्या माध्यमातून पेटीएम ग्राहकांना दोन लाखांपर्यंतचे कर्ज देणार आहे. या व्यक्तिगत कर्जाची भरपाई करण्यासाठी ग्राहकांना 18 ते 36 महिन्यांच्या EMI चा पर्याय उपलब्ध असणार आहे. अशा प्रकारचे कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी पेटीएमने अनेक बँका आणि एनबीएफसी सोबत करार केला आहे.

गुगल प्ले स्टोअरवर पुन्हा Paytm आलं, का हटवलं होतं पेटीएम?

कसं मिळणार कर्ज पेटीएमच्या अॅपमध्येच एक पर्सनल लोन नावाचा पर्याय उपलब्ध असणार आहे आणि त्यातूनच आपल्याला कर्जासाठी अॅप्लाय करता येणार आहे. कर्जाचा परतावाही याच अॅपच्या माध्यमातून करता येणार आहे. महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया संपूर्णत: डिजिटल स्वरुपाची असणार आहे. हे कर्ज बँक आणि एनबीएफसीतर्फे देण्यात येणार असून पेटीएम केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या भूमिकेत कार्य करणार आहे.

सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध

हे कर्ज कोणाला मिळणार? नोकरी करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त लहान व्यापारी आणि व्यावसायिकांना हे कर्ज उपलब्ध होणार आहे. क्रेडिट स्कोर आणि खरेदी करण्याच्या पॅटर्नच्या आधारे हे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकदा कर्ज उपलब्ध करुन दिल्यानंतर ग्राहक आपल्या सोईनुसार EMI चा कालावधी निवडू शकणार आहे.

या नव्या कल्पनेमुळे एका बाजूला बँका आणि एनबीएफसी यांना नवीन ग्राहक उपलब्ध होणार असून दुसऱ्या बाजूला पेटीएमलाही त्याचा फायदा होणार आहे.

भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget