एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध

पेटीएम फर्स्ट गेम्सने (पीएफजी) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं आहे. परंतु या निर्णयाला देशातील छोट्या व्यावसायिकांनी विरोध करत सचिनला पत्र लिहिलं आहे.

मुंबई : पेटीएमची सहयोगी कंपनी पेटीएम फर्स्ट गेम्सने (पीएफजी) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं आहे. पेटीएमने मंगळवार (15 सप्टेंबर) जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं की, "सचिन तेंडुलकर हे अब्जावधी क्रिकेटप्रेमींमधील एक लोकप्रिय नाव आहे. देशामध्ये रोमांचक फॅण्टसी खेळांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. केवळ फॅण्टसी क्रिकेटच नाही तर कबड्डी, फुटबॉल आणि बास्केटबॉल यांसारख्या खेळांमध्येही पीएफजीला लोकप्रिय बनवण्यासाठी मदत करु शकतात."

परंतु या निर्णयाला देशातील छोट्या व्यावसायिकांनी विरोध करत, सचिन तेंडुलकरने आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंतीही केली आहे. देशातील छोट्या व्यापाऱ्यांची संस्था कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) यासंदर्भात सचिन तेंडुलकरला पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे. सीएआयटीचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सचिनला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "तुमच्या या निर्णयामुळे देशात आक्रोश आहे, कारण ज्या कंपनीने तुम्हाला ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनवलं आहे, त्यामध्ये चीनची कंपनी अलिबाबाची गुंतवणूक आहे. पेटीएम फर्स्ट गेम्स पेटीएम आणि अलिबाबाची कंपनी एजी टेक यांचं जॉईंट व्हेंचर आहे."

सचिन तेंडुलकर पेटीएम फर्स्ट गेम्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर, छोट्या व्यापाऱ्यांचा विरोध

निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती प्रवीण खंडेलवाल यांनी पुढे लिहिलं आहे की, "सीमेवरील झटापटीत आपले 20 जवान शहीद झाले आणि सीमेवर चीन वारंवार आक्रमकता दाखवत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही चीनची गुंतवणूक असलेल्या कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनण्याचा निर्णय घेतला, जो देशातील लोकभावनेच्या विरोधात आहे. तुमच्यासारखा लोकप्रिय खेळाडू लोकभावना समजण्यास कसा काय अपयश ठरला हे समजत नाही. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की, कृपया तुम्ही आपल्या या निर्णयावर फेरविचार करा आणि प्रस्ताव स्वीकारु नका. याद्वारे चीनला कठोर संदेश जाईल की, या कठीण प्रसंगात तुम्ही देशासोबत उभे आहात."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake - Manoj Jarange : मारामाऱ्या कोण लावतं हे जनतेला कळतं - मनोज जरांगेManoj Jarange Sambhajinagar PC : काही जणांना थुंका चाटायची सवय असते,  लक्ष्मण हाकेंना टोलाABP Majha Headlines :  12 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Sawant Meet Govinda :  माजी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंतांकडून गोविंदाची विचारपूस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले, स्वत: गाडी चालवत मातोश्रीवर गेले? वंचितचा खळबळनजक दावा
वंचितचा खळबळजनक दावा, देवेंद्र फडणवीस 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटले, दाव्यात किती तथ्य?
Sarva Pitri Amavasya 2024 : 2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
2 की 3 ऑक्टोबर? कधी आहे सर्वपित्री अमावस्या? याच दिवशी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण; अचूक तिथी, श्राद्ध वेळ जाणून घ्या
Maharashtra Assembly Election 2024 : मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
मोठी बातमी : मविआचं ठरलं, दसऱ्याला जागावाटप जाहीर करणार, 250 जागांवर एकमत!
Govinda Gunfire: गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
गोविंदाच्या गुडघ्यातून डॉक्टरांनी बंदुकीची गोळी काढली; प्रचंड रक्तस्राव, नेमकं घडलं काय?
ऐश्वर्याला झालाय 'हा' आजार, सारखं वाढतंय वजन? सोशल मीडियावर दावा, नेटकरी म्हणाले,
दुर्धर आजारानं ग्रस्त ऐश्वर्या, सारखं वाढतंय वजन? नेटकरी म्हणाले, "अच्छा, म्हणूनच अभिषेकसोबत घटस्फोट..."
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, वेळोवेळी धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत
Embed widget