एक्स्प्लोर
पॅनासॉनिकचा एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोन लाँच
मुंबई: मोबाइल कंपनी पॅनासॉनिकनं आपल्या एलुगा सीरीजमधील एक नवा स्मार्टफोन एलुगा आय 3 मेगा लाँच केला आहे. हा स्मार्टफोन एलुगा आय 3 चं नवं व्हर्जन आहे. ज्यामध्ये कंपनीनं नवे फीचर्स आणले आहेत.
या फोनची खासियत म्हणजे याची बॅटरी 4000 mAh आहे. हा स्मार्टफोन 11,490 रुपयांना खरेदी करता येणार आहे.
हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटसह ऑफलाइन रिटेलरकडेही उपलब्ध असणार आहे.
पॅनासॉनिक एलुगा आय 3 मेगा स्मार्टफोनचे खास फीचर्स:
- या स्मार्टफोनमध्ये डिस्प्ले 5.5 इंच आहे. तसेच यात 2.5 डी कर्व्ह्ड ग्लास आहे.
- 1.3 गीगाहर्त्झ ऑक्टाकोअर प्रोसेसर
- 3 जीबी रॅम आणि 16 जीबी इंटरनल मेमरी, एसडी कार्डनं 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येईल.
- अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम
- 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
- बॅटरी 4000 mAh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement