वनप्लसचा नवीन कॉन्सेप्ट फोनचा टिझर रिलीज; 3 मार्चला होऊ शकतो लॉन्च
कॉन्सेप्ट वनमध्ये कंपनीने खास कलर-शिफ्टिंग मटीरियलचा वापर केला असून दोन ग्लास पॅनल्समध्ये असलेल्या मटेरियल्समुळे पॅनलची जाडी फक्त 0.35mm आहे. खास सिस्टिम आणि अत्यंत कमी पावरचा वापर केल्यामुळे 0.7 सेकेंदातच कॅमेरा सिस्टिम हाइड होते.
नवी दिल्ली : टेक कंपनी वनप्लसच्या वतीने पहिला कॉन्सेप्ट फोटो वर्षाच्या सुरुवातीलाच CES 2020 या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आला होता. कंपनीच्या वतीने या फोनला Concept One असं नाव देण्यात आलं होतं. आता कंपनीने आणखी एक कॉन्सेप्ट फोन पाहायला मिळणार असून हा फोन 3 मार्च रोजी शोकेस केला जाऊ शकतो. वनप्लस इंडिया ट्विटर हॅन्डलवर या नव्या डिव्हाइसचा टिझर लॉन्च करण्यात आलं आहे. ट्विटरवर कंपनीच्या वतीने आणखी एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक खास प्रकारचा कॅमेरा फिचर देण्यात आलं आहे. वन प्लसच्या यूके ट्विटर हॅन्डलवर काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. परंतु, या फोटोंवरून कंपनीच्या आगामी मॉडेलबाबत अंदाजा लावणं अजूनही अशक्यचं आहे.
2020 is the year of surprises. Can you guess what's coming up? pic.twitter.com/EWWi1MEwo0
— OnePlus India (@OnePlus_IN) February 28, 2020
समोर आलेला टीझर आणि काही डिटेल्सनुसार, नवी स्मार्टफोन एक कॉन्सेप्ट फोन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यामध्ये अनेक शानदार फिचर्स युजर्सना पाहायला मिळू शकतात. वनप्लसच्या वतीने याआधीही OnePlus Concept One स्मार्टफोन इंट्रोड्यूस करण्यात आलं आहे. हा कॉन्सेप्ट फोन कंपनीने McLaren सुपरकार सोबत पार्टनरशिपमध्ये तयार केला होता. या फोनच्या डिझाइनमध्ये सुपरकार कंपनीचे खास एलिमेंट्स वापरण्यात आले होते. स्मार्टफोनमध्ये रियर पॅनलवर खास डिसअपियरिंग प्रायमरी कॅमेरा सेटअप देण्यात आला होता. जो फक्त सुरू केल्यावरच दिसत होता.
This is cool. pic.twitter.com/M8fJRM5zsR
— OnePlus UK (@OnePlus_UK) February 29, 2020
मागील कॉन्सेप्टमधील फिचर्स
कॉन्सेप्ट वनमध्ये कंपनीने खास कलर-शिफ्टिंग मटीरियलचा वापर केला असून दोन ग्लास पॅनल्समध्ये असलेल्या मटेरियल्समुळे पॅनलची जाडी फक्त 0.35mm आहे. खास सिस्टिम आणि अत्यंत कमी पावरचा वापर केल्यामुळे 0.7 सेकेंदातच कॅमेरा सिस्टिम हाइड होते. पेटेंट इमेजमध्ये स्मार्टफोनची पुढिल बाजू दिसत आहे. परंतु, यावर कोणताही सेल्फी कॅमेरा दिसत नाही. दरम्यान, या स्मार्टफोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासारखा सेटअपही कोणत्याच इमेजमध्ये दिसून येत नाही. अशातच वनप्लसच्या वतीने इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा इंट्रोड्यूस करण्यात येत आहे.
इन-डिस्प्ले कॅमरा रेडी नाही
इन-डिस्प्ले कॅमरा टेक्नॉलॉजी आतापर्यंत मास-प्रोडक्शन असणाऱ्या स्मार्टफोनसाठी तयार नाही. दरम्यान, ओप्पोच्या वतीने काही दिवसांपूर्वीच कन्फर्म करण्यात आलं आहे की, Find X2मध्ये कंपनी इन-डिस्प्ले कॅमेरा देणार नाही, कारण ही टेक्नॉलॉजी आतापर्यंत तयार झालेली नाही. दरम्यान, या पेटेंटमध्ये इनविजिबल बॅक कॅमेरा दिला जाऊ शकतो. वनप्लस आधीच कॉन्सेप्ट फोनमध्ये इलेक्ट्रोक्रोमिक टेक्नॉलजीच्या मदतीने असं केलं आहे. कंपनीच्या वतीने नवी कॉन्सेप्ट फोनमध्ये खास टेक्नॉलॉजी पाहायला मिळू शकते, परंतु पुढच्या वनप्लस फ्लॅगशिपमध्ये हे फिचर्स मिळतीलच असं नाही.
संबंधित बातम्या :
व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्रामचे खास फिचर्स
व्हॉट्स अॅपवरील चुकून डिलीट झालेले मेसेज 'असे' मिळवा परत
मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स