एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्रामचे खास फिचर्स
मॅसेजिंग अॅप टेलीग्रामने आपल्या ग्राहकांसाठी नवीन फिचर्स आणले आहे.
नवी दिल्ली : मॅसेजिंग अॅप टेलीग्रामने व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी खास फिचर्स आणले आहे. या फिचर्सनुसार युजर्सला आपल्या मनानुसार थीमसोबत मॅसेज पाठवता येणार आहे. टेलीग्रामला जास्तीत जास्त युजर्ससोबत जोडण्यासाठी हे नवीन फिचर्स आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच टेलीग्राम मॅसेज शेड्यूल करण्याची सुविधाही आपल्या युजर्सला देण्याची शक्यता आहे.
टेलीग्राम अॅप जास्तीत जास्त फ्लेक्सिबल करण्याचे कंपनीकडून प्रयत्न आहे. कारण, यामुळे जास्तीत जास्त लोक टेलीग्रामसोबत जोडले जातील. टेलीग्राम आपल्या युजर्ससाठी वेगवेगळे मोड आणण्याच्याही विचारात आहे. व्हाइट आणि डार्क मोड याअगोदरच या अॅपमध्ये इनबिल्ट आहे. हे फिचर्स युजर्ससाठी जास्तीत जास्त फ्रेंडली करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. ज्यात कलर चेंज करणे, टेक्स्ट फॉन्ट वेगळ्या फॉर्मट लिहिण्यासोबत युजर्स आपल्या आवडीनुसार थीम निवडू शकतो. टेलीग्राम शेड्यूल करण्यासाठी 'सेंड व्हेन ऑनलाईन' फिचर्स घेऊन येणार आहे. यामध्ये समोरचा व्यक्ती ऑनलाईन नसला तरी तुम्ही त्याला मॅसेज पाठवू शकता. ज्याक्षणी समोरचा व्यक्ती ऑनलाईन येईल त्यावेळी त्याला तुमचा मॅसेज तत्काळ दिसेल. नवीन व्हर्जनला युजर्स आपल्या पद्धतीने वापरू शकणार आहे. कारण, यात कस्टमाईजची सुरुवात आहे.
हेही वाचा - मंदीतून बाहेर पडण्यासाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून बंपर ऑफर, 'या' गाड्यांवर खास ऑफर्स
टेलीग्राम काय आहे?
टेलीग्राम हे एक सोशल मॅसेजिंग अॅप आहे. हे सध्याच्या व्हाट्सअॅपप्रमाणेच काम करते. या मॅसेजिंग अॅपमधून फोटो, टेक्स्ट आणि व्हिडीओ शेअर करता येतात. व्हिडीओ शेअर करण्यासाठी इथं साईजचे अजिबात बंधन नाही. किती मोठ्या फाईल असल्या तरी टेलीग्रामद्वारे त्या सहज एकमेकांना पाठवता येतात. व्हाट्सअॅप हे अॅप टेलीग्रामचा मुख्य स्पर्धक आहे. त्यामुळेच व्हाट्सअॅपला टक्कर देण्यासाठी टेलीग्राम नेहमी नवनवीन फिचर्स आपल्या ग्राहकांसाठी घेऊन येत असते. यावेळी त्यांनी अशाच प्रकारचे फिचर्स आणले आहे.
हेही वाचा - 26 कोटी फेसबुक यूजर्सचा डेटा ऑनलाइन लीक!
Sophia Robot | आयआयटी टेक फेस्टमधल्या सोफिया रोबोची खास मुलाखत | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement