एक्स्प्लोर
अमेझॉनवर प्राईम मेंबर्ससाठी 'वन प्लस 3T'चा एक्स्क्लुझिव्ह सेल
मुंबई : अमेझॉन इंडियाने 'वन प्लस 3T'चा एकदिवसीय एक्स्क्लुझिव्ह सेल सुरु केलाय. 128 जीबी व्हेरिएंटचा वन प्लस 3T स्मार्टफोन अमेझॉनच्या आजच्या सेलमध्ये फक्त प्राईम मेंबर्सना खरेदी करता येणार आहे. मात्र, 25 फेब्रुवारीपासून सर्व ग्राहकांसाठी खुली असेल.
वन प्लस 3T च्या 128 जीबी स्टोरेजच्या गनमेटल व्हेरिएंटची किंमत 34 हजार 999 रुपये आहे. अमेझॉन इंडियावर प्राईम मेंबर्ससाठी हा एक्स्क्लुझिव्ह सेल आज (17 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत सुरु असेल. वन प्लस 3T चं 64 जीबी स्टोरेजचं व्हर्जन सॉफ्ट गोल्ड कलरमध्येही उपलब्ध आहे. मात्र, 128 जीबी स्टोरेजचं व्हेरिएंट केवळ गनमेटल कलरमध्येच बाजारात आणलं गेलंय. 'वन प्लस 3T'चे फीचर्स : - 5.5 इंचाचा HD डिस्प्ले (1080 x 1920 पिक्सेल रिझॉल्युशन) - क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 821 प्रोसेसर - 6 जीबी रॅम - 16 मेगापिक्सेल फ्रंट आणि रिअर कॅमेरा - गोरिल्ला ग्लास 4 प्रोटेक्शन - 3400 mAh क्षमतेची बॅटरी - 4G LTE सपोर्ट 'अमेझॉन प्राईम मेंबर्स' म्हणजे काय? अमेझॉनकडून ग्राहकांना 'प्राईम मेंबरशिप' दिली जाते. त्यासाठी अमेझॉनच्या वेबसाईटवर लॉग इन करुन एक विशिष्ट प्रोसेस आहेत. या मेंबरशिपच्या माध्यमातून ग्राहकांना काही ऑफर्सचा सर्वात आधी लाभ घेता येतो. शिवाय, अनेकदा प्रॉडक्ट मोफत घरपोच दिला जातो. अमेझॉनच्या एक्स्क्लुझिव्ह ऑफर्स प्राईम मेंबर्सना इतर ग्राहकांच्या आधी मिळतात. जे प्राईम मेंबर्स नाहीत, असे ग्राहक वेबसाईटवर जाऊन मेंबरशिप घेऊ शकतात.Our heavy duty 128 GB #OnePlus3T is back in stock on 17 Feb for @amazonIN Prime members. Brace yourselves. https://t.co/RnvNuMrHwm pic.twitter.com/qM4CDW5pvs
— OnePlus India (@OnePlus_IN) February 16, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement