एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता ट्राफिकचे नियम तोडल्यास पेटीएम मदतीला धावणार
मुंबई : नोटाबंदीनंतर कॅशलेस इकॉनॉमीसाठी सरकारकडून विविध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. अनेक खासगी कंपन्याही आपापल्यापरीने डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. कॅशलेस इकॉनॉमीला चालना मिळाल्याने पेटीएमसारख्या ई-वॉलेट कंपन्यांनाही मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे अशा कंपन्याही ग्राहकांसाठी आणखी नाविन्यपूर्ण आणि वेगवेगळे प्रयोग करताना दिसत आहेत.
आता ट्राफिकचे नियम तोडल्यावर वाहतूक पोलिसांनी पकडल्यास, दंडाची रक्कम पेटीएमच्या माध्यमातून भरता येणार आहे. पेटीएमच्या वेबसाईटवर ‘Challan’ असा खास पर्याय त्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
पेटीएमच्या अॅपवर या सुविधेची अद्याप सुरुवात झाली नसली, तरी वेबसाईटवर सुविधा सुरु करण्यात आली आहे.
वाहतूक नियम तोडल्यावर पेटीएमवरुन दंड कसा भराल?
गाडीच्या नोंदणी नंबरवर चलन बनवल्यानंतर यूझर्स पेटीएमवर लॉग इन करा. त्यानंतर शहर निवडण्याचा पर्याय तुमच्यासमोर येईल. त्यात सर्व माहिती भरल्यानंतर पेमेंटचा पर्याय समोर येईल, तिथे तुम्ही पेमेंट करु शकता.
डिजिटल पेमेंट करण्याआधी तुमचा नंबर नीट तपासून घ्या. पेमेंट झाल्यावर डिजिटल इनव्हॉईस तुम्हाला मिळेल. त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले डॉक्युमेंट पोस्टल सर्व्हिसद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील.
पेटीएमच्या या सेवेमुळे डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी पोलिस विभागाच्या पायऱ्या झिजवण्याची गरज भासणार नाही आणि त्यामुळे वेळेचीही बचत होईल. सध्या काही शहरांपुरती मर्यादित असलेली पेटीएमची ही सुविधा लवकरच किती शहरांपर्यंत पोहोचवली जाते, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement