एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोकियाच्या आगामी स्मार्टफोनचा पहिला फोटो लीक
नवी दिल्ली : नोकिया आपला आगामी स्मार्टफोन 2017 च्या सुरुवातीला लाँच करणार असल्याची नुकतीच माहिती समोर आली होती. मात्र आता या फोनचा एका फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
चिनी वेबसाईट वीबोने हा फोटो शेअर केला आहे. वीबोच्या रिपोर्टमध्ये या फोनच्या फीचर्सचाही उल्लेख करण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार या फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 23 मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.
या फोनचं नाव नोकिया P असेल, असं बोललं जात आहे. मात्र लाँचिंगबाबत अद्याप कसलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण हा फोन 2017 मध्येच लाँच होईल, हे नोकियाचं लायसन्स असणारी कंपनी HMD ग्लोबलकडून अधिकृतपणे कळवण्यात आलं आहे.
नोकियाचा D1C लवकरच बाजारात?
दरम्यान नोकिया काही महिन्यातच आपला नवा अँड्रॉईड स्मार्टफोन नोकिया D1C लाँच करु शकतं. या स्मार्टफोनचे दोन व्हर्जन लाँच करण्यात येणार आहेत, अशी माहिती काही दिवसांपुर्वी समोर आली होती.
नोकियाच्या अँड्रॉईड D1C चे दोन मॉडेल असतील. या दोन्ही स्मार्टफोनचे फीचर्स वेगवेगळे असतील. 5 इंच डिस्प्ले असणार असून यात तर 2 जीबी रॅम आणि 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा यामध्ये असणार आहे. यामध्ये 5.5 इंच डिस्प्ले असणार आहे. 3 जीबी रॅम आणि 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा असू शकतो.
रिपोर्ट्सनुसार, नोकिया D1C मध्ये 1.4GHz स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसरसोबत अॅड्रीनो 505 GPU असणार आहे. याच्या 2 जीबी व्हेरिएंटची किंमत 10 हजार आणि 3 जीबी व्हेरिएंटची किंमत 13 हजार असण्याची शक्यता आहे.
संबंधित बातमी :
नोकियाच्या अँड्रॉईड स्मार्टफोनचे फीचर आणि किंमत लीक
नोकियाच्या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल मोठा खुलासा
नोकियाचा D1C स्मार्टफोन लवकरच बाजारात
नोकियाचा नवा अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन कंपनीची पत राखणार का?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement