एक्स्प्लोर
23 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, नोकिया 8 चा नवा फोटो समोर
नोकिया 8 या स्मार्टफोनविषयी अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. मात्र आता या फोनचा फोटो समोर आला आहे. हा फोन 31 जुलैला लाँच होणार असल्याचं वृत्त असतानाच हा फोटो समोर आला आहे.

मुंबई : नोकिया 8 या स्मार्टफोनविषयी अनेक लीक रिपोर्ट समोर आले आहेत. मात्र आता या फोनचा फोटो समोर आला आहे. हा फोन 31 जुलैला लाँच होणार असल्याचं वृत्त असतानाच हा फोटो समोर आला आहे. टिप्स्टर इव्हान ब्लासने हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोनुसार नोकिया 8 ला मेटल बॉडी असेल. तर व्हर्टिकल ड्युअल रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनचा फ्रंट लूकही आकर्षक आहे. समोर होम बटण देण्यात आलं आहे, जे फिंगरप्रिंट सेन्सर असण्याची शक्यता आहे. एचमएडी ग्लोबलकडे नोकियाचे हक्क आहेत. या कंपनीने Zeiss सोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे नोकिया 8 मध्ये Zeiss लेंस असेल, असा अंदाज लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरला. यापूर्वीच्या लीक रिपोर्टनुसार, नोकिया 8 मध्ये क्वालकॉम लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर, 5 इंच आकाराची आणि 5.5 इंच आकाराची स्क्रीन असे दोन व्हेरिएंट, 4 किंवा 6 GB रॅम, 128 GB स्टोरेज आणि 23 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल.
Before You Go
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बुलढाणा
व्यापार-उद्योग
कोल्हापूर

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















