एक्स्प्लोर
Advertisement
'नोकिया 2' बजेट स्मार्टफोन आज लॉन्च होणार
आज नोकिया आपला नोकिया 2 स्मार्टफोन एका खास कार्यक्रमात लॉन्च करणार आहे. नोकियाचा हा इव्हेंट कंपनी फेसबुकवरुन लाईव्ह केला जाणार आहे.
मुंबई : एचएमडी ग्लोबलनं नोकियाचा आणखी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी चालवली आहे. आज नोकिया आपला नोकिया 2 स्मार्टफोन एका खास कार्यक्रमात लॉन्च करणार आहे. नोकियाचा हा इव्हेंट कंपनी फेसबुकवरुन लाईव्ह केला जाणार आहे.
नोकियानं एचएमडी ग्लोबलच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत कमबॅक केलं आहे. नोकियाचा हा बजेट फोन असेल ज्यात तब्बल 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच अँड्रॉईड नॉगट 7.1 ऑपरेटिंग सिस्टिम असेल, तसंच अँड्रॉईड ओरिओमध्ये अपग्रेडेबल असेल.
कंपनीनं अद्याप या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरीही सर्वसामान्यांच्या खिशाला हा स्मार्टफोन परवडणारा असेल. 8 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 8 जीबीचं इंटर्नल स्टोरेजही कंपनीनं नोकिया 2 मध्ये दिलं आहे.
नोकिया 2 चे फिचर्स
ऑपरेटिंग सिस्टिम : अँड्रॉईड नॉगट 7.1
डिस्प्ले : 5 इंचाचा फूल एचडी डिस्प्ले
रॅम : 1 जीबी
प्रोसेसर : स्नॅपड्रगन 212
बॅटरी : 4000 mAh
कॅमेरा : 8 मेगापिक्सेल रिअर आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
मेमरी : 8 जीबी इंटर्नल मेमरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement