एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नोकियाचा सर्वात स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन Nokia 1 भारतात लाँच
नोकिया 1 या स्मार्टफोनची किंमत 5499 रुपये आहे. भारतातील सर्व स्मार्टफोन स्टोअरवर हा फोन उपलब्ध असणार आहे.
मुंबई : नोकियाचा पहिला अँड्रॉईड गो स्मार्टफोन नोकिया 1 भारतात लवकरच उपलब्ध होणार आहे. हा स्मार्टफोन HMD ग्लोबलने MWC 2018 मध्ये लाँच केला होता. हा नोकियाचा सर्वात स्वस्त अँड्रॉईड ओएसवर चालणारा स्मार्टफोन आहे.
किंमत आणि ऑफर
नोकिया 1 या स्मार्टफोनची किंमत 5499 रुपये आहे. भारतातील सर्व स्मार्टफोन स्टोअरवर हा फोन उपलब्ध असणार आहे. या फोनवर काही ऑफरही देण्यात आल्या आहेत. या स्मार्टफोनसोबत जियो फुटबॉल कॅशबॅक ऑफर देण्यात आली असून ज्यामध्ये यूजर्सला तब्बल 2200 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.
नोकिया 1 स्मार्टफोनचे फीचर :
नोकिया 1 स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनमध्ये केवळ 1 जीबी रॅम देण्यात आली आहे. तर यात मीडियाटेक एमटी प्रोसेसरही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सल रिअर आणि 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर याची बॅटरी 2150 mAh आहे. यामध्ये वायफाय आणि ब्लूटूथही देण्यात आलं आहे.
काय आहे अँड्रॉईड गो?
अँड्रॉईड गो हे गुगलच्या मुख्य ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड ओरियोचं लाईट व्हर्जन आहे. अँड्रॉईड गो हे कमी किमतीच्या स्मार्टफोनसाठीच लाँच करण्यात आलं आहे.
दरम्यान, भारतात कधीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरु होईल याची नेमकी तारीख कंपनीने जाहीर केलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement