एक्स्प्लोर
'पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल!', मोटोरोलाचं मराठीतून ट्वीट
मुंबई: मोटोरोला Moto G5 हा आपल्या नवा स्मार्टफोन 4 एप्रिलला भारतात लाँच करणार आहे. मात्र, त्याआधी मोटोरोलानं प्रमोशनसाठी एक नवा फंडा वापरल्याची चर्चा झाली सुरु आहे. कारण की, मोटोरोलानं आपलं अधिकृत ट्विटर अकाउंट असलेल्या मोटो इंडियावरुन चक्क मराठीतून ट्वीट केले आहेत.
मोटोरोलानं केलेल्या मराठी ट्विटवरुन नेमका अंदाज बांधणं तसं कठीण आहे. पण हे ट्वीट मोटो जी5 च्या प्रमोशनसाठी आहेत का? असा प्रश्न नेटीझन्सना पडला आहे.
'पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल! लवकरच, काहीतरी दमदार होणार आहे!' असं ट्विट मोटोरोलानं केलं आहे. त्यामुळे मोटोरोला पुण्यात नवं काही सुरु करणार आहे का? असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींवरुन नेटीझन्सनं मात्र अनेक अर्थ लावण्यास सुरुवात केली आहे. पण हे नेमकं कशासाठी केलं आहे हे लवकरच स्पष्ट होईल.पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल! लवकरच, काहीतरी दमदार होणार आहे!
— Moto India (@Moto_IND) March 30, 2017
काय होत आहे कोणाला माहित आहे का? — Moto India (@Moto_IND) March 30, 2017मोटो इंडियानं एकूण 5 ट्वीट मराठीतून केले आहेत. या सर्व ट्विटला ट्विपल्सनं मोठ्या प्रमाणात रिप्लायही दिले आहेत. एकूणच 'मोटो'चा मराठी ट्वीट मागचा नेमका 'मोटो' काय हे येता काही दिवसात सर्वांसमोर येईलच. संबंधित बातम्या: भारतात 4 एप्रिलला Moto G5 स्मार्टफोनचं लाँचिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement