एक्स्प्लोर
मोटोरोलाच्या मोटो जी5 प्लसचे फोटो, फीचर्स लीक
मुंबई: मोटोरोलचा आगामी स्मार्टफोन मोटो जी5 प्लसचे फोटो आणि फीचर्स लीक झाले आहेत. मोटोरोला जी5 प्लस स्मार्टफोनच्या कथित फोटोबाबत टेकअपडेट3 नं माहिती दिली आहे. या फोटोमध्ये डिव्हाइसच्या रिअरवर एक फिंगरप्रिंट सेन्सर आणि त्याखाली मोटोचा लोगोही आहे. याआधी जो फोटो लीक झाला होता त्यावर मोटो एक्स 2017 असं म्हटलं होतं.
याआधी लीक झालेल्या रिपोर्टमध्ये या स्मार्टफोनच्या फिचर्सबद्दल माहिती देण्यात आली होती. या डिव्हाइमध्ये 5.5 इंच फूल एचडी 1080x1920 पिक्सल डिस्प्ले असणार आहे. यामध्ये एक ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम आहे. यामध्ये 3080 mAh बॅटरी आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज असल्याचंही समजतं आहे.
यामध्ये ड्यूल एलईडी फ्लॅशसोबत 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेराही यात असणार असल्याचं म्हटलं आहे. कथित मोटो जी5 प्लस हा कंपनीचा बजेट स्मार्टफोन असेल असा दावाही करण्यात आला आहे.
लवकरच या स्मार्टफोनबाबत अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समजते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement