एक्स्प्लोर
मोटो E4 आणि मोटो E4 प्लस भारतात लाँच
नवी दिल्ली : मोटो ई 4 आणि मोटो ई 4 प्लस हे मच अवेटेड स्मार्टफोन अखेर भारतात लाँच झाले आहेत. मोटो ई 4 प्लस आज रात्री 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. तर मोटो ई 4 8 हजार 999 रुपयांत ऑफलाईन विक्रीसाठीही उपलब्ध असेल, अशी माहितीही कंपनीने दिली आहे.
दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात दोन्ही फोन लाँच करण्यात आले. बुधवारपासून मोटो ई 4 देशभरात ऑफलाईन विक्रीसाठी उपलब्ध असेल, अशी माहिती कंपनीने दिली. 5000mAh क्षमतेची बॅटरी हे मोटो ई 4 प्लसचं खास वैशिष्ट्य आहे.
मोटो ई 4 प्लसची भारतातील किंमत आणि लाँचिंग ऑफर्स :
मोटो ई 4 प्लसची भारतातील किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन देशभरात 32 GB स्टोरेज आणि 3 GB रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोटो ई 4 प्लस खरेदी करतांना मोटो प्लस 2 चे 1599 रुपये किंमतीचे हेडफोन 749 रुपयांत मिळणार आहेत.
याशिवाय हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. आयडिया ग्राहकांना 443 रुपयात तीन महिन्यांसाठी 84 जीबी डेटा दिला जाईल. जिओच्या ग्राहकांना जिओ प्राईम अधिक 30 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर या फोनवर 9 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर आणि 4 हजार रुपयांच्या बायबॅक गॅरंटीचीही कंपनीने घोषणा केली आहे.
मोटो ई 4 प्लसचे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.1.1 नॉगट सिस्टम
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- मीडियाटेक एमटीके 6737 एम प्रोसेसर
- फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- स्वतंत्र मायक्रो एसडी कार्ड स्लॉट
- 3GB रॅम, 32 GB स्टोरेज
- 4G VoLTE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement