WhatsApp वरुन पेमेंट सुविधा सुरू; सेटअप अॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
आता WhatsApp वरूनही करता येणार पैसे ट्रान्सफर. सेटअप अॅक्टीव कसे करावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आजपर्यंत आपल्याला फोटो, व्हिडिओ पाठवणे शक्य होते. परंतु, व्हॉट्सअॅपनं लाँच केलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणेही शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार आता ही सुविधा उपलब्ध झाली आहे.
नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिलेल्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅपला भारतात यूपीआय आधारित सिस्टम सुरू करण्याची परवानगी दिली होती. जून महिन्यामध्ये व्हॉट्सअॅपने पेमेंट सर्व्हिस सुरू केली होती. परंतु, ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही व्हॉट्सअॅप यूजर्सला मिळाली होती. मात्र, कंपनीने ही मर्यादा आता वाढवली आहे.
NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधेसाठी गो लाईव्हची मंजुरी देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप या मंजुरीच्या प्रतिक्षेत होता, कारण या सुविधेची चाचणी अगोदरच घेण्यात आली होती. त्यानुसार आता व्हॉट्सअॅप पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
WhatsApp Pay अॅक्टिवेट कसे करावे?
- सर्व प्रथम, अॅप स्टोअर किंवा Google Play Store वर जा आणि आपले व्हॉट्सअॅप अॅप अपडेट करा.
- आता तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटींग्सवर जावे लागेल. Payment पर्याय सेटिंग्जमध्ये दिसत असेल तर आपल्या सेटिंग्जला फॉलो करा.
- पेमेंट विभागात गेल्यावर तुम्हाला नवीन पेमेंट आणि Add New Payment Method चा पर्याय मिळेल. आपल्याला नवीन पेमेंट पद्धत जोडावी लागेल.
- आता आपल्याला नवीन पेमेंटमध्ये जाऊन आपलं बँक खाते निवडायचं आहे.
- आपल्याला बर्याच बँकांची यादी दिसेल. बँक निवडल्यानंतर, आपले खाते व्हेरीफाय केलं जाईल. तिथे Verify Via SMS चा पर्याय सापडेल. तो सिलेक्ट करा.
- विशेष म्हणजे आपला व्हॉट्सअॅप नंबर आणि अकाऊंट एकत्र लिंक करण्यात आलं आहे. मात्र, नंबर एकच असायला हवा, तेव्हाचं व्हेरीफिकेशन होईल.
- व्हेरीफिकेशननंतर, फिनिश पेमेंट सेटअपवर टॅप करा. आता आपल्याला अन्य अॅप्समध्ये दिलेल्या माहितीनुसार यूपीआय पिन सेटअप करण्याचा पर्याय मिळेल. प्रत्येक देयकावर यूपीआय पिन प्रविष्ट करणे आवश्यक असेल.
- सेटअप पूर्ण झाल्यानंतर WhatsApp वरही मॅसेजप्रमाणे पैसे पाठवू शकता.
- आपल्याला आपल्या WhatsApp कॉन्टॅक्ट वर टॅप करुन चॅटिंग बॉक्स ओपन करायचा आहे.
- आता आपल्याला अटचमेंट आइकॉन वर जाऊन Payment चा ऑप्शन वर टॅब करुन अमाऊंट टाकायची आहे.
- WhatsApp Payment फक्त व्हॉट्सअॅपच्या यूजर्ससाठीचं नाही तर ज्यांचे UPI अॅक्टिव आहे, त्यांनाही तुम्ही पैसे पाठवू शकता.
- पैसे पाठवताना आपण नोट्स किंवा मजकूर देखील लिहून पैसे पाठवू शकता.