एक्स्प्लोर
पोकेमॉन गो खेळणाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारी टोळी जेरबंद
पुणे: स्मार्टफोनवर ‘पोकेमॉन गो’ खेळणं, तसंच चालता-चालता व्हॉट्सअॅप चॅट करणं अनेकांना महागात पडलं आहे. कारण पोकेमॉन खेळण्यात आणि व्हॉट्सअॅप चॅटमध्ये गुंग असणाऱ्या तरुणांचे स्मार्टफोन चोरट्यांनी लंपास केले आहेत. पुण्यात मोबाईल हिसकावून पळवून नेल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.
मोबाईल चोरणाऱ्या दोन तरुणांना कोथरूड पोलिसांनी पकडले आहे. अभिजीत सुदेश शिंदे वय १९, आणि विशाल विलास फाटक वय २१ अशी त्यांची नावं आहेत.
त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे सोळा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोथरूड तसेच पौड रस्ता भागात, रस्त्याने मोबाईलवर गेम खेळत जाणाऱ्या व ऑनलाइन असणाऱ्या पादचारी तरुणांचे मोबाईल हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पौड रस्त्यावर एका तरुणीचा मोबाईल तिच्या हातातून हिसकावून नेल्याचीही घटना घडली होती. त्या अनुषंगाने कोथरूड पोलिसांचे पथक चोरट्यांचा माग काढत होते.
चोरटे मोबाईल हिसकाविल्यानंतर भरधाव दुचाकीवरून पसार व्हायचे. त्यामुळे त्यांचे वर्णन देखील पोलिसांना मिळत नव्हते. पोलिसांनी विविध ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळून पाहिले होते. मात्र, चोरटे सापडत नव्हते.
पोलीस चोरट्यांना शोधत असतानाच खबऱ्यामार्फत दोन जणांनी मोबाईल हिसकाविण्याचे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी अभिजीत शिंदे आणि विशाल फाटक या दोघांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांना अटक केली.
त्यांच्या कबुलीनंतर त्यांच्या अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींनी चोरलेले मोबाईल त्यांच्या अल्पवयीन मित्रांकडे दिले होते. त्यांच्याकडून सोळा मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement