एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सेल्फी चाहत्यांसाठी मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन लाँच
सध्या सेल्फीची बरीच क्रेझ तरुणाईमध्ये आहे. याचाच विचार करुन मायक्रोमॅक्सनं नवा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे.
मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सनं सोमवारी आपला नवा स्मार्टफोन 'सेल्फी 2' लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपये आहे. सेल्फी चाहत्यांची आवड लक्षात घेऊन हा स्मार्टफोन तयार करण्यात आला आहे.
सेल्फी चाहत्यांसाठी या स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्यावर विशेष लक्ष देण्यात आलं आहे. यामध्ये फ्रंट फ्लॅशसोबत 8 मेगापिक्सल सोनी सेन्सर फ्रंट कॅमेरा आहे. तर 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच सुपर पिक्सल, पॅनोरोमा हे फीचरही यामध्ये आहेत.
या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 720x1280 पिक्सल आहे. तसेच यामध्ये 1.3 GHz क्वॉड कोअर मीडियाटेक प्रोसेसर असून यात 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. तसेच 32 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून एसडी कार्डनं 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. तसेच यामध्ये मल्टी टास्किंग विंडो यासारखे नवे फीचरही देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 3000 mAh आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement