एक्स्प्लोर

नवीन स्विफ्ट आणि डिझायर गाड्या मारुतीने परत मागवल्या

हॅचबॅक आणि सिडान मॉडेल्सच्या एअरबॅग कंट्रोलर युनिटमध्ये बिघाडाच्या शक्यतेमुळे नवीन स्विफ्ट आणि डिझायरची 1279 वाहनं रिकॉल करण्यात आली आहेत.

मुंबई : 'मारुती सुझुकी' या वाहन निर्मिती करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या कंपनीने स्विफ्ट आणि डिझायरची नवीन मॉडेल्स परत मागवली आहेत. हॅचबॅक आणि सिडान मॉडेल्सच्या एअरबॅग कंट्रोलर युनिटमध्ये बिघाडाच्या शक्यतेमुळे 1279 वाहनं रिकॉल करण्यात आली आहेत. स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायरच्या मॉडेल्समध्ये एअरबॅग्ज नसल्याची शक्यता आहे. त्यामुळेच कंपनीने या गाड्या परत मागवून तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 7 मे 2018 ते 5 जुलै 2018 या कालावधीत निर्मिती झालेल्या 1 हजार 279 गाड्या रिकॉल केल्या आहेत. यामध्ये 566 नवीन स्विफ्ट आणि 713 नवीन स्विफ्ट डिझायरचा समावेश आहे. रिकॉल कॅम्पेन अंतर्गत आजपासून (25 जुलै) संबंधित वाहनांच्या मालकांना मारुती सुझुकीच्या डिलरकडून संपर्क साधला जाईल. कारची तपासणी आणि नादुरुस्त पार्ट्सची मोफत रिप्लेसमेंट करुन दिली जाणार आहे. दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये फेब्रुवारी महिन्यात नवीन स्विफ्ट, तर गेल्या वर्षी नवीन स्विफ्ट डिझायर लाँच झाली होती. तुमच्या गाडीतील बिघाड कसा तपासाल? मारुती सुझुकीच्या वेबसाईटवर जा. चेसिस नंबरमध्ये 14 डिजीटचा अल्फा न्यूमरिक क्रमांक टाका. नवीन स्विफ्ट मालकांनी MBH आणि नवीन डिझायर मालकांनी MA3 नंबर टाकावा. चेसिस नंबरमध्ये तुम्हाला वेहिकल आयडी प्लेट आणि वेहिकल/रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्स दिसतील. मारुती सुझुकीच्या वर्कशॉपमध्ये जाऊनही ग्राहक याविषयी माहिती घेऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000

रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Rathod Car Accident : संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, पिकअपला दिली जोरदार धडकमाझं गाव , माझा जिल्हा : Majha Gaon Majha Jilha : 6.30AM Superfast News : 04 October 2024Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा

Embed widget