एक्स्प्लोर
मारूती सुझुकीकडून कारच्या किंमतीत 20,000 रुपयांनी वाढ
नवी दिल्ली: मारूती सुझुकी या देशातील नंबर एकची कंपनीने ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. मारूती सुझुकीने आपल्या सर्व मॉडेलच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मारूतीने आपल्या गाड्यांच्या किमतीत 20,000पर्यंत वाढ करण्याचे ठरवले आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीची विटारा ब्रेजा या मॉडेल कारची किंमत 20,000 रुपयांनी वाढ केली आहे. तर मारूतीची सर्वात जास्त लोकप्रिय कार बलेनोच्या किमतीमध्ये 10,000 रुपयांनी वाढ केली आहे. कंपनीने हे नवीन दर आजपासूनच लागू करणार असल्याचे सांगितले.
नुकत्याच लाँच झालेल्या मारूती सुझुकीच्या विटारा ब्रेजा या कारला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लाँचिंगपासून चारच महिन्यात तब्बल 1 लाख ग्राहकांनी या गाडीसाठी बुकींग केले आहे. या व्यतिरिक्त सियाज या कारची देखील कारशैकींनांमध्ये मोठी क्रेझ आहे. या कारनेही काही महिन्यांच्या अवधीत 1 लाखांची विक्रीचा विक्रम केला आहे.
कंपनीने जुलैमध्ये कारची विक्रीमी विक्री केली होती. या वर्षीच्या जुलैमध्ये कंपनीच्या कार विक्रीमध्ये 12.7%नी वाढ होऊन 1.37 लाख युनिटस केली होती. कंपनीने जुलै महिन्यात 1,37,116 कारची विक्री केली. तर 2015 मध्ये कंपनीने 1, 21, 712 कारची विक्री केली होती.
काही महिन्यांपूर्वी कंपनीने आपल्या कारच्या किमतीत वाढ करून ग्राहकांना जोरदार धक्का दिला होता. मार्चमध्ये कंपनीने कारच्या किमतीत 34,500 रुपयांनी वाढ केली होती. यासाठी कंपनीने केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात, कार उत्पादक कंपनीच्या इन्फ्रास्ट्रक्चवर सेझ कर लावला होता. त्यामुळे कंपनीला कारच्या किमतीत वाढ करणे अपरिहार्य झाल्याचे कारण दिले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement