Markandey Katju On Twitter : मार्कंडेय काटजूंची एलॉन मस्कला विनंती, 'कृपया twitter वरील शब्दमर्यादा वाढवा'
Markandey Katju On Twitter : ट्विटरवरील शब्दमर्यादेबाबत अनेक युजर्सनी सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी देखील एलॉन मस्कला विनंती केलीय.
Markandey Katju On Twitter : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटर (Twitter) मायक्रोब्लॉगिंग साइटचे प्रमुख बनले आहेत. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी गेल्या आठवड्यात 44 अब्ज देऊन ट्विटर अधिग्रहण करार केला आणि मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरचा ताबा घेतला. मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरवर बरेच बदल होण्याची शक्यता आहे, असे संकेत मागच्या काही दिवसांत वेळोवेळी त्यांनी ट्वीट करून दिले आहेत. ट्विटरवरील शब्दमर्यादाबाबत अनेकांनी वेळोवेळी सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू (Markandey Katju) यांनी देखील एलॉन मस्कला विनंती करत ट्विट पोस्ट केले आहे.
@elonmusk : Please consider increasing the number of letters allowed on twitter. 280 is too few for any meaningful message. I suggest 420 wud be proper, or possibly 500. I am a former judge of Indian Supreme Court, & regularly use twitter
— Markandey Katju (@mkatju) November 1, 2022
मार्कंडेय काटजूंची एलॉन मस्कला विनंती
मार्कंडेय काटजू यांनी एलॉन मस्कला विनंती करत म्हटलंय, 'कृपया twitter सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर शब्दसंख्या खूपच मर्यादीत आहे. ती वाढविण्याचा विचार करा. ट्वीट पोस्ट करताना एखादा अर्थपूर्ण संदेशासाठी 280 शब्द खूप कमी तसेच मर्यादीत आहे. पोस्ट करण्यासाठी किमान 420 ते 500 शब्दमर्यादा असली पाहिजे, असे मी सुचवितो. मी भारतीय सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश आहे आणि नियमितपणे twitter वापरतो' असे ते म्हणाले.
नवीन कंपनीचा बोर्ड सेटअप "तात्पुरता" आहे - एलॉन मस्क
इलॉन मस्क यांनी ट्विटरचे प्रमुख म्हणून पद स्वीकारल्यानंतर काही तासातच ट्विटरचे जुने कंपनीचे बोर्ड काढून टाकले आहे आणि आता एलॉन मस्क हे सध्या कंपनीचे एकमेव संचालक आहेत, असे कंपनीने सोमवारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे कळवलं आहे. मस्क यांनी नंतर ट्विटरवर सांगितले की, हा नवीन कंपनीचा बोर्ड सेटअप "तात्पुरता" आहे, परंतु आता कंपनीच्या नवीन बोर्डात कोण असेल यासंदर्भातले कोणतेही तपशील देण्यात आलेले नाही.
इतर महत्वाच्या बातम्या