एक्स्प्लोर
Advertisement
मेड-इन-इंडिया जॅग्वार एफ-पेस कार लाँच, किंमत 60.02 लाख रुपये
भारतात ही कार तयार झाल्यानं या टॉप मॉडेल कारची किंमत बेसिक मॉडेलपेक्षाही कमी आहे.
मुंबई : जॅग्वार लॅण्ड रोव्हरनं भारतात तयार केलेली एफ-पेस ही एसयूव्ही कार लाँच करण्यात आली आहे. या कारची किंमत तब्बल 60.02 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. या कारचा फक्त टॉप मॉडेल भारतात उपलब्ध आहे. याची डिलिव्हरी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सुरु होणार आहे.
ही कार पुण्याच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही जॅग्वारची सहावी कार आहे. भारतात ही कार तयार झाल्यानं या टॉप मॉडेल कारची किंमत बेसिक मॉडेलपेक्षाही कमी आहे. बेस व्हेरिएंट प्योरची किंमत 68.40 लाख आहे. पहिले प्रेस्टिज व्हेरिएंटची किंमत 73.25 लाख होती. जी आता तब्बल 13 लाखांनी स्वस्त झाली आहे.
या कारमध्ये अडॅप्टिव हेडलाईट, अॅक्टिव्हिटी की, वाय-फाय हॉटस्पॉट आणि प्रो सर्विसेस देण्यात आलं आहे. यामध्ये 10.2 इंच टचस्क्रिन आणि 11 स्पीकर्स 380 वॉटचं मेरिडियन साउंड सिस्टम देण्यात आली आहे.
तसेच यामध्ये 2.0 लीटरचं 4 सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिजेल इंजिन आहे. जे 179 पीएस पॉवर आणि 430 एनएम टॉर्क देतं.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement