एक्स्प्लोर
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारचं आज लाँचिंग
नव्या वेरना कारची स्पर्धा होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाज आणि फॉक्सवॅगन वेंटोशी असणार आहे.
मुंबई : ह्युंदाईची नवी वेरना कार आज लाँच होणार आहे. या कारची किंमत 7.99 लाख ते 12.49 लाख रुपये (एक्स शोरुम किंमत) असू शकते. या कारची स्पर्धा होंडा सिटी, मारुती सुझुकी सियाज आणि फॉक्सवॅगन वेंटोशी असणार आहे.
नव्या ह्युंदाई वेरना कार इ, इएक्स, एसएक्स आणि एसएक्स (ओ) या चार व्हेरिएंटमध्ये आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेल आणि म्यॅनुअल, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन पर्याय असणार आहेत. .
ही कार कंपनीनं के2 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. यामध्ये अनेक सेगमेंट फीचर आहेत. नव्या वेरना कारच्या टॉप व्हेरिएंटमध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो सपोर्ट करणारं इंफोटेंमेंट सिस्टम, वेंटिलेटेड सीट्स, रिअर सन ब्लाईंड आणि सहा एअर बॅ असणार आहेत.
नव्या वेरना कारमध्ये 1.6 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन असणार आहे. तसेच दोन्ही इंजिनमध्ये 6 स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असणार आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement