एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असल्याचा प्रत्येकाला अभिमान
लातूर: लातूर जिल्ह्यातल्या मुरुडमध्ये युवक काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने व्हॉट्सअॅप ग्रुप केला. ग्रुपवरची मंडळी एकमेकांच्या संपर्कात होती. नेहमीसारखे जोक्स, फोटो शेअर होत होते. पण दुष्काळात एक दुर्देवी घटना घडली, त्यानंतर मात्र या ग्रुपवरच्या चर्चेचा नूर पालटला. त्यातून जे घडलं, ते महाराष्ट्राला दिशा देणार ठरत आहे.
नेहमीप्रमाणं मुरुड युवा ग्रुपवर जोक्स आणि फोटो शेअर व्हायचे. मात्र जानेवारीत विजय जाडकर नावाच्या उच्चशिक्षित तरुणानं आत्महत्या केल्याची पोस्ट पडली.
शोकाकूल ग्रुपवर तातडीनं कुटुंबासाठी मदतीचं आवाहन झालं. तिसऱ्याच दिवशी पन्नास हजाराच्या मदतीतून जाडकर कुटुंबाला 5 शेळ्या देण्यात आल्या.
या घटनेनंतर ग्रुपवर पुन्हा चर्चेला वेग आला. शेतकऱ्यांसाठी शाश्वत मदत का देता येईल याबाबत पोस्ट पडू लागल्या. मग चर्चा झाल्या. त्यातून फक्त डिझेल घेऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांची तीन एकरपर्यंतची शेती नांगरुन देण्याचं ठरलं.
ग्रुपनं 600 शेतकऱ्यांची 2 हजार एकर जमीन पेरणीयोग्य केली. ग्रुपनेच ट्रॅक्टर भाड्याने घेतले.
कोणी अमेरिकेतून मदत केली, तर कुणी परराज्यातून. फक्त चर्चा नको कृती करू असं ठरलं.
शेत नांगरुन दिल्यावर तब्बल 10 लाखाचं बियाणं वाटप झालं. 100 शेतकर्यांना सोयबीनच्या 30 किलोच्या बॅगा वाटल्या. अट एकच. शेतकऱ्यांनी शेतात किमान पाच झाड लावायची.
मी ग्रुपमुळे उभा राहिलो, नाहीतर आत्महत्या केली असती, असं सुदर्शन नाडे हा शेतकरी सांगतो.
3 वर्षानंतर भरभरुन पाऊस पडल्यानं सोयाबीन तरारुन आलं. उतारा चांगला पडला. शेतकऱ्यांनी ग्रुपकडून घेतलेलं बियाणे परत केले आहे.
या ग्रुपचा अॅडमिन युवक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं ग्रुपच्या कामाला काँग्रेस नेते नारायण राणे, अमित देशमुखांनीही मदत केली.
बियाण्यासाठी औरंगाबादच्या खान अब्दुल बाशितांनी ईदीची रक्कम दिली.
याचाच अर्थ काम चांगले असले आणि प्रचारासाठी सोशल मीडीयाचा वापर केला तर दाते अमेरिकेतूनही मदत करायला तयार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement