एक्स्प्लोर
Advertisement
जाणून घ्या; काय आहे WhatsApp Business; काय आहे फायदा? कसं करतं काम?
लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या व्हॉट्स अॅपने आता व्हॉट्स अॅप बिजनेस सुरू केलं आहे. जाणून घ्या नक्की कसं काम करतं हे अॅप...
नवी दिल्ली : भारतासह जगभरात WhatsApp अत्यंत प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅप हे अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलं आहे. सर्वात लोकप्रि प्लॅटफॉर्म असल्यामुळए व्हॉट्सअॅप लहान उद्योगांच्या विकासासाठी व्हॉट्सअॅप बिजनेसमार्फत अनेक सोयी पुरवत आहे. व्हॉट्सअॅप बिजनेसचा हेतू व्यवसाय आणि ग्राहकांना जोडणं हा आहे. हे अॅप खासकरून छोट्या व्यवसायांना ग्राहकांसोबत जोडण्यासाठी आणि त्यांचे ऑर्डर्स मॅनेज करण्यासाठी डिझाइन करण्यात आलं आहे.
काय आहे WhatsApp Business?
मुख्यतः व्हॉट्सअॅप बिजनेस हे अॅप छोट्या व्यवसायांच्या मालकांसाठी तयार करण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तुम्ही वेबसाईट किंवा इमेल अॅड्रेस यांसारख्या महत्त्वपूर्ण माहिती शेअर करण्यासाठी एक बिजनेस प्रोफाइल तयार करू शकता. याचा वापर आपलं प्रोडक्ट दाखवण्यासाठी तसेच कॅटलॉग तयार करण्यासाठी करू शकता. यामाध्यमातून तुम्ही आपल्या प्रोडक्ट्सची व्हरायटी शेअर करू शकता, ऑर्डर घेऊ शकता.तसेच ग्राहकांच्या शंकांचं निरसनही या माध्यामातून करू शकणार आहात.
WhatsApp आणि WhatsApp Business मध्ये काय फरक आहे?
WhatsApp आणि WhatsApp Business एकसारखेच दिसत असतील, परंतु दोन्ही वेगवेगळे अॅप आहेत. व्हॉट्सअॅप एक मेसेजिंग अॅप आहे, जे तुम्हाला तुमचं कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात राहण्यास मदत करतात. तसेच व्हॉट्सअॅप बिजनेस तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी मदत करेल. हे अॅप तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत संवाद करण्यासाठी आणि आपला ब्रँड विकसित करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. दोन अॅप्समध्ये देण्यात आलेल्या सुविधांमध्ये फरक आहे. तसेच काही गोष्टी सारख्याही आहेत. परंतु, व्हॉट्सअॅप बिजनेसमध्ये बिजनेस प्रोफाइल आणि बिजनेस मेसेजिंग टूल यांसारख्या विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या :
शेअर बाजार तेजीत; दिवसाच्या सुरुवातीला निफ्टी 9000 तर सेन्सेक्स 30 हजार पार
कर्जाच्या हफ्त्यांसाठीचा बँकांनी दिलेला दिलासा पडू शकतो 'महागात'!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement