एक्स्प्लोर
तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?
2007 मध्ये फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी डेव्हलपर्सला निमंत्रित केले होते. त्यावेळी फेसबुककडून स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, थर्ड पार्टी वेबसाईट्सना फेसबुक युजर्सची फ्रेण्ड लिस्ट, लाईक्स, युजर बिव्हेइयर यांच्याशी संबंधित माहितीचा अॅक्सेस दिला जाईल.
मुंबई : केम्ब्रिज अॅनॅलिटिका या पॉलिटिकल कन्सल्टंन्सी कंपनीने फेसबुक युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर केल्याचे प्रकरण समोर आले आणि इंटरनेट जगतात एकच खळबळ माजली. केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने फेसबुकच्या जवळपास 5 कोटी युजर्सचा डेटा एका अॅपच्या माध्यमातून मिळवला. या डेटाचा वापर अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या फायद्यासाठी करण्यात आला, असा आरोप आहे.
धक्कादायक म्हणजे, अवघ्या इंटरनेट जगताला हादरवणाऱ्या आणि फेसबुकच्या विश्वासार्हतेसह सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभ्या करणाऱ्या या प्रकारावर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्याकडे काहीच ठोस उत्तर नाही.
खरंतर वैयक्तिक माहिती युजर्सच्या परवानगीविना वापरण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही आणि फेसबुकच्या बाबतीत तर नाहीच नाही. युजर्सही अनेकविध प्रकारे फेसबुकसोबत आपली खासगी माहिती शेअर करतात. ही माहिती युजर्सच्या परवानगीविना फेसबुक आपल्या फायद्यासाठी वापरत असते. मात्र, केम्ब्रिज अॅनॅलिटिकाने ज्या संख्येत युजर्सची माहिती मिळवून, तिचा गैरवापर केल्याच आरोप आहे, ते अत्यंत गंभीर प्रकरण मानले जात आहे.
फेसबुक आणि युजर सिक्युरिटी अशा मुद्द्यांवरुन अनेकदा वाद-विवाद झाले आहेत. मात्र केम्ब्रिज अॅनॅलिटिकाशी संबंधित प्रकरणावरुन वादाला गंभीर वळण मिळाले आहे. ट्विटरवर तर फेसबुकविरोधात मोहीम उघडली गेलीय आणि #DeletFacebook नावाने कॅम्पेन चालवले जात आहे.
आता आपण जाणून घेऊया, युजर्स फेसबुकवरुन आपली खासगी माहिती नेमक्या कशा प्रकारे शेअर करतात.
ब्राऊजिंग डिटेल
जेव्हा तुम्ही फेसबुकवर ऑनलाईन येता, त्यावेळी एकूण तीन माध्यमातून तुमच्या प्रत्येक डिजिटल हालचालीवर नजर ठेवली जाते.
- तुमचं ब्राऊजिंग म्हणजे, तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल सर्च करत आहात, याची माहिती इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला असते.
- होस्ट वेबसाईट म्हणजे, ज्या वेबसाईटचा तुम्ही वापर करत आहात, त्या वेबसाईटच्या अॅडमिनना तुमच्या ब्राऊजिंग डेटाची माहिती असते..
- फेसबुकवरुन एखाद्या लिंकवर क्लिक करता, त्यावेळी तुमचा कशात रस आहे, याची माहिती फेसबुकला कळत असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement