एक्स्प्लोर
आयफोन, आयपॉड, मॅकबुक आणि अॅपल वॉचचं डिझाईन बनवणारे जॉनी आईव्ह अॅपलला रामराम करणार
तंत्रज्ञान विश्वाला मोठा धक्का देणारी एक घटना घडली आहे. अॅपल कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाचा वाटा असणारे आणि अॅपलच्या विविध उत्पादनांना खास डिझाईनद्वारे आकार देणारे डिझायनर जॉनी आईव्ह अॅपल कंपनीतून बाहेर पडणार आहेत.
कॅलिफोर्निया : तंत्रज्ञान विश्वाला मोठा धक्का देणारी एक घटना घडली आहे. अॅपल कंपनीला यशाच्या शिखरावर नेण्यात महत्त्वाचा वाटा असणारे आणि अॅपलच्या विविध उत्पादनांना खास डिझाईनद्वारे आकार देणारे डिझायनर जॉनी आईव्ह अॅपल कंपनीतून बाहेर पडणार आहेत. गेली 30 वर्षे आईव्ह अॅपलसाठी काम करत होते.
1998 साली जॉनी आईव्ह यांनी आयमॅक डिझाईन केलं. त्यानंतर 2001 साली आयपॉड, 2004 मध्ये आयपॉड मिनी, 2007 मध्ये आयफोन, 2008 मध्ये मॅकबुक एअर, 2010 मध्ये आयपॅड, 2015 मध्ये अॅपल वॉच या उत्पादनांचं आईव्ह यांनी डिझाईन केलं आहे.
अॅपलसाठी इतक्या चांगल्या डिझाईन्सची उत्पादनं बनवणारे आईव्ह अॅपलमधून बाहेर पडणार असल्यामुळे आता अॅपलच्या उत्पादनांचे डिझाईन्स कोण बनवणार? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. परंतु यामध्ये चिंतेची बाब नाही. कारण अॅपलमधून बाहेर पडून जॉनी आईव्ह स्वतःची लव्हफॉर्म नावाची डिझाईन कंपनी सुरु करणार आहेत. लव्हफॉर्म ही कंपनी आता अॅपलच्या उत्पादनांचं डिझाईन करणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement