एक्स्प्लोर

जिओ फोन अखेर लाँच, फीचर्स काय? बुकिंग कसं कराल?

रिलायन्सचा मच अवेटेड जिओ फोन 15 ऑगस्टला लाँच करण्यात आला आहे. 24 ऑगस्टपासून या फोनसाठी बुकिंग सुरु करता येईल. तर सप्टेंबरमध्ये हा फोन ग्राहकांच्या हातात पडणार आहे.

मुंबई : रिलायन्सचा जिओ फोन अखेर स्वातंत्र्यदिनी लाँच करण्यात आला आहे. हा फोन 15 ऑगस्टला लाँच होईल, असं रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितलं होतं. हा फोन आजपासून जिओच्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. तर सप्टेंबरमध्ये हा फोन ग्राहकांच्या हातात पडणार आहे. जिओच्या कर्मचाऱ्यांकडून या फोनची बीटा टेस्टिंग केली जाईल. ग्राहकांच्या हातात फोन पडण्यापूर्वीची ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चाचणी असते. 24 ऑगस्टपासून अधिकृतपणे या फोनसाठी बुकिंग सुरु होणार असून सप्टेंबरमध्ये हा फोन ग्राहकांना मिळणार आहे. जिओ फोनचे फीचर्स जिओचा हा फीचर फोन आहे. यामध्ये काही मल्टीमीडिया अॅप्स असतील. तर 4 G VoLTE कॉलिंग असेल. तर केबलद्वारे टीव्हीला फोन जोडण्यासाठी टेलीव्हिजन सेटही मिळणार आहे. जिओच्या कर्मचाऱ्यांकडून आता या सर्व फीचर्सची चाचणी केली जाणार आहे. ग्राहकांना हा फोन घेतल्यानंतर 153 रुपयांमध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा मिळणार आहे. तर टीव्हीला फोन जोडता यावा, यासाठी 'जिओ फोन टीव्ही केबल' दिली जाईल. फोन टीव्हीला जोडायचा असल्यास 309 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागेल. जिओचा हा सिंगल सिम स्लॉट फोन आहे. यामध्ये 2.4 इंच आकाराची स्क्रीन, टॉर्चलाईट, एफएम, 22 भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड असे फीचर्स असतील. दरम्यान सध्या तरी या फोनमध्ये व्हॉट्सअॅप सपोर्टीव्ह नसल्याची माहिती आहे. तर डिजीटल पेमेंट करण्यासाठी एनएफसी सपोर्ट असेल, हे फीचर ओटीए सॉफ्टवेअर अपग्रेडनंतर मिळेल. वेळेपूर्वीच जिओ फोनसाठी बुकिंग सुरु जिओ फोनची अधिकृत बुकिंग 24 ऑगस्टला सुरु होणार आहे. मात्र दिल्ली एनसीआरमध्ये काही ऑफलाईन स्टोअर्समध्ये आत्तापासूनच प्री-बुकिंग सुरु झाल्याचं वृत्त ‘गॅजेट 360’ ने दिलं आहे. 15 ऑगस्ट रोजी हा फोन लाँच होणार आहे. जिओ फोनसाठी फक्त आधार कार्डची गरज जिओ फोनची बुकिंग करताना तुम्हाला अधिकृत जिओ फोन विक्रेत्याकडे आधार कार्डची एक झेरॉक्स द्यावी लागेल. एक व्यक्ती एका आधार कार्डवर देशात एकच फोन खरेदी करु शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक फोन बुक करण्याची इच्छा असेल तर तसं करता येणार नाही. आधार कार्ड दिल्यानंतर नोंदणी होईल, त्यानंतर टोकण नंबर देण्यात येईल. हा टोकण नंबर फोन घेताना उपयोगी येईल. जिओ फोनसाठी किती पैसे लागणार? जिओ फोन हा शून्य रुपये किंमतीमध्ये असेल, मात्र अनामत रक्कम म्हणून 1500 रुपये द्यावे लागतील, अशी घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी केली होती. मात्र ऑफलाईन फोन खरेदी करताना तुम्हाला आधार नंबर व्यतिरिक्त कशाचीही गरज नाही. फोन हातात पडेल तेव्हा 1500 रुपये द्यावे लागतील. हे 1500 रुपये तीन वर्षांनी परत मिळतील. जिओ फोन हातात कधी पडणार? जिओ फोनची आत्ता बुकिंग केल्यास डिलीव्हरी 1 ते 4 सप्टेंबर या काळात मिळण्याची शक्यता आहे. पुढे बुकिंगची संख्या वाढल्यास फोन उशीराही मिळू शकतो. आधी बुक करणाऱ्या ग्राहकालाच अगोदर फोन मिळणार आहे. जिओ फोन 24 ऑगस्टपासून माय जिओ अॅप, जिओची वेबसाईट किंवा रिलायन्स स्टोअर्समध्ये जाऊन बुक करु शकता. संबंधित बातम्या :

जिओ फोनची बुकिंग वेळेपूर्वीच सुरु, कोणती कागदपत्र लागणार?

जिओ फोनची ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकिंग कशी कराल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
Embed widget