एक्स्प्लोर
जिओची 'Dhan Dhana Dhan'ऑफर, यूजर्सला मिळणार 168GB डेटा!
मुंबई: जिओनं समर सरप्राईज ऑफर मागे घेतल्यानंतर जिओनं आज (मंगळवारी) एका नव्या नव्या ऑफरची घोषणा केली आहे. (Dhan Dhana Dhan) 'धन धना धन' ही नवी ऑफर जिओ आणली आहे. ही ऑफर 309 आणि 509 रुपयांच्या रिचार्जवर मिळणार आहे.
कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, जिओचे प्राईम मेंबर्सला 309 रुपयांच्या रिचार्जवर 84 जीबी डेटा मिळेल. ही ऑफर 84 दिवसांसाठी वैध असणार आहे. त्याशिवाय 509 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर प्राईम यूजर्सला तब्बल 168 जीबी डेटा मिळणार आहे. याची वॅलिडिटी देखील 84 दिवस असणार आहे. याआधी कंपनीनं 549 रुपयात 56 जीबी डेटा 28 दिवसांसाठी अशी ऑफर आणली होती.
309 रुपयांच्या प्लानवर यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. तर 509 रुपयांच्या प्लानवर दररोज 2 जीबी डेटा मिळेल.
कोणाला मिळणार या ऑफरचा फायदा?
कंपनीन स्पष्ट केलं आहे की, प्राईम मेंबर या ऑफरचा लाभ आपल्या पहिल्या रिचार्जवर घेऊ शकतात. पण ज्यांनी समर सरप्राईज ऑफर घेतली आहे ते यूजर्स ही ऑफर घेऊ शकणार नाही.
ट्रायच्या आदेशाचे पालन करत रिलायन्स जिओनं समर सरप्राइज ऑफर परत घेतली होती. पण कंपनीनं त्यानंतर लगेचच नव्या ऑफरसाठी तयारी केली होती.
15 एप्रिलपर्यंत घेता येणार प्राईम मेंबरशीप
जियोनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 15 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. पण प्राईम मेंबरशीप घेणारअया यूजर्सला समर सरप्राईज ऑफरचा फायदा मिळणार नाही. पण हे यूजर्स प्राईम मेंबर झाल्यानंतर 303 रुपयांचं रिचार्ज करुन 28 दिवसांपर्यंत दररोज 1 जीबी 4जी डेटा वापरु शकतात.
काय होती समर सरप्राईज ऑफर?
31 मार्चला जिओनं घोषणा केली होती की, ज्यांनी प्राईम मेंबरशीप घेतली आहे त्यांना 30 जूनपर्यंत 1जीबी / 2जीबी फ्री डेटा वापरता येणार होता. ज्यांनी 99 रुपये भरुन प्राईम मेंबरशीप घेतली आणि 303 रुपयांचं रिचार्ज केलं त्यांना ही ऑफर मिळणार होती. सरप्राईज ऑफरमध्ये यूजर्सला पहिल्याप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग मिळणार होतं. 15 एप्रिलपर्यंत सरप्राईज ऑफर घेता येत होती. मात्र, TRAI त्याच्यावर बंदी घातली.
संबंधित बातम्या:
रिलायन्स जिओकडून समर सरप्राईज ऑफर मागे
जिओची समर सरप्राईज ऑफर अजूनही सुरुच?
आयडियाचा नवा प्लान, 100 रुपयात 10 जीबी डेटा
जिओच्या 'या' रिचार्ज प्लानवर तब्बल 100 जीबी मोफत डेटा
रिपोर्ट : भविष्यातही जिओ इतर कंपन्यांसाठी धोकादायक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
रायगड
जळगाव
Advertisement