एक्स्प्लोर
प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओचं गिफ्ट, दररोज 1GB ची मर्यादा वाढवली
एअरटेलच्या प्लॅन्सला टक्कर देत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिओनेही नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील रिचार्ज प्लॅन्सची स्पर्धा रिलायन्स जिओने आणखी वाढवली आहे. एअरटेलच्या प्लॅन्सला टक्कर देत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिओनेही नव्या प्लॅनची घोषणा केली आहे.
नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये पहिल्याच किंमतीत जास्त डेटा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. सोबतच जिओने 98 रुपयांचा नवा प्लॅनही आणला आहे. यामध्ये 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगसह 2GB डेटा मिळेल.
जुन्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत जिओ आता जास्त डेटा देणार आहे. पूर्वी 147 रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह 1GB डेटा मिळत होता. मात्र याऐवजी आता 1.5GB डेटा मिळेल. जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची असेल.
349, 399 आणि 499 रुपयांचा प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांनाही आता दररोज 1GB ऐवजी 1.5GB डेटा मिळेल. या प्लॅन्सच्या व्हॅलिडिटीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जिओच्या ज्या प्लॅन्समध्ये अगोदर 2GB डेटा मिळत होता, त्यामध्येही आता बदल करण्यात आला आहे. 198, 398, 448 आणि 498 रुपयांच्या प्लॅनमध्ये आता 1.5GB ऐवजी 2GB डेटा मिळेल. या प्लॅनच्याही व्हॅलिडिटीमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement