एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जीपच्या तीन गाड्या लवकरच भेटीला, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट
मुंबई: अमेरिकेची प्रसिद्ध एसयूव्ही निर्मिती कंपनी जीप लवकरच भारतात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे पुढील महिन्यातच म्हणजेच ऑगस्ट 2016 मध्येच जीप उद्योग सुरु करणार आहे. तर 2017 पासून पुण्यातील रांजनगावात कंपनी आपला प्लांन्ट सुरु करणार आहे.
सध्या जीप आपली प्रसिद्ध जीप ग्रँड चेरोकी, ग्रँड चेरोकी SRT आणि ऑफ रोड रँगलर अनलिमिटेड या गाड्या बाजारात आणणार आहे.
फोटो - लवकरच जीप भारतात, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट
फिएटची मालकी असलेल्या या कंपनीने 2016 दिल्ली ऑटो एक्स्पोमध्ये आपल्या गाड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं. जीप रेनेगेडचे फोटोही प्रसिद्ध झाले होते. हीच जीप रेनेगेडही भारतात लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. रांजनगावात गाड्यांची निर्मिती कंपनी आपला ब्रँड आणि तीनही गाड्या सोबतच लाँच करणार आहे. सुरुवातीला या गाड्या बाहेरुन भारतात आणल्या जातील. मात्र फिएटने घोषणा केल्याप्रमाणे, कंपनी पुण्याजवळच्या रांजनगावात 1854 कोटींचा प्लाँट उभा करणार आहे. त्यामुले 2017 च्या मध्यावधीपर्यंत जीपच्या सर्व गाड्या भारतातच म्हणजे पुण्यातच तयार होतील. ग्रँड चेरोकीची वैशिष्ट्ये *जीपच्या ग्रँड चेरोकीमध्ये 240 बीएचपी, 3.0 लिटर V6 इकोडीझल इंजिन आहे. *8 स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स *ग्रँड चेरोकीमध्ये 4x4 सुविधा *12.8 किमी प्रतिलिटर मायलेज *सहा रंगात उपलब्ध ग्रँड चेरोकी SRTची वैशिष्ट्ये - *ग्रँड चेरोकीपेक्षा जास्त शक्तीशाली *475 बीएचपी इंजिन, 6.4 लिटर HEMI V8 पेट्रोल इंजिन *8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जीप रँगलरची वैशिष्ट्ये *जीप रँगलर अनलिमिटेडमध्ये 2.8 लिटर डिझल इंजिन *197 बीएचपी इंजिन *460Nm टॉर्क *12.1 किमी प्रतिलिटर मायलेज *सहा रंगात उपलब्धफोटो - लवकरच जीप भारतात, रांजनगावात मेगा प्रोजेक्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement