एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई आयआयटी विद्यार्थांची गगनभरारी, 'प्रथम'चं यशस्वी उड्डाण
श्रीहरीकोटा : आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'प्रथम' उपग्रहाचं यशस्वी उड्डाण झालं आहे. श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन स्पेस सेंटरमधून 9 वाजून 12 मिनिटांनी 'प्रथम' यशस्वीपणे अवकाशात झेपावला.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या पीएसएलवी-सी35 या प्रक्षेपकातून आज वेगवेगळ्या 8 उपग्रहांसह 'प्रथम'चं यशस्वी प्रक्षेपण केलं.
इस्रोने विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधन कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थी उपग्रह योजना सुरु केली होती. त्या योजनेअंतर्गत हा उपग्रह आज प्रक्षेपित करण्यात आला. या उपग्रहाच्या माध्यमातून विद्युत परमाणु मोजता येणार आहेत. या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा विद्यार्थी उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे.
मुंबई आयआयटीच्या ‘प्रथम’ची उद्या गरुडझेप?
आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांकडून 'प्रथम'ची निर्मिती आयआयटी मुंबईच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग विभागात शिक्षण घेणाऱ्या सप्तश्री बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या विद्यार्थ्यांना जुलै 2007 मध्ये ‘प्रथम’ची संकल्पना सुचली होती. त्यानुसार आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंगच्या विभागाने उपग्रह बनवण्याची सुरुवात केली. इस्रोने 2009 मध्ये या उपग्रहाबाबत करार केला. मात्र काही कारणास्तव या उपग्रहाच्या उड्डाणाला हिरवा कंदील मिळत नव्हता. मधल्या काळात ‘प्रथम’मध्ये अनेक बदल करण्यात आले. अंतराळात उड्डाण केल्यानंतर हा प्रथम 4 महिने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणार आहे. या उपग्रहावर आतापर्यंत 30 विद्यार्थ्यांनी काम केले असून त्याच्यासाठी दीड कोटी रुपये खर्च आला आहे. देशातील 15 विद्यापीठांमधील माहिती संकलन केंद्रांमध्ये उपग्रहात नोंदवलेल्या विद्युत परमाणुंची नोंद होणार आहे. या केंद्रांमध्ये मुंबईतील अथर्व महाविद्यालयाचाही समावेश आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement