एक्स्प्लोर
Advertisement
Chandrayaan-2 ने टिपलेला चंद्राचा पहिला फोटो
14 ऑगस्टला चंद्रयान-2 यानाला चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. 20 ऑगस्टला ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
नवी दिल्ली : Chandrayaan-2 भारताच्या चंद्रयान-2 ने दोन दिवसांपूर्वीच चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. आता चांद्रयान-2 ने चंद्राचा पहिला फोटो काढला आहे. सुमारे दोन हजार सहाशे 50 किमीच्या उंचीवरुन हा फोटो घेण्यात आला आहे. हा फोटो इस्त्रोने आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केलाय.
14 ऑगस्टला चंद्रयान-2 यानाला चंद्राच्या दिशेने कक्षेकडे मार्गस्थ करण्यात यश आले. 20 ऑगस्टला ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या चांद्रयान-2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोने दिली. चांद्रयान-2 अंडाकृती कक्षेत 24 तास प्रदक्षिणा घालणार आहे. यादरम्यान चांद्रयान -2चा वेग 10.98 किमी प्रतिसेकंदवरून कमी करून 1.98 किमी प्रतिसेकंद करण्यात येणार आहे. चांद्रयान-2 चा वेग 90 टक्क्यांनी कमी केलाय. चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळं अनियंत्रित होऊन धडकू नये यासाठी चांद्रयान-2 चा वेग कमी करण्यात आलाय. आता 7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे.
चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, लँडर (विक्रम) व रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. या यानाचा कार्यकाळ एक वर्ष असून चंद्रावरील एक दिवस हा भारताच्या 14 दिवसांबरोबर असतो. आता याच चांद्रयान 2 ने चंद्राचा पहिलावहिला फोटो पाठवला आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेतील दुसरा महत्वाचा आणि कठीण टप्पा असल्याचं इस्रोचे अध्यक्ष के. सीवन यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी इस्रोसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. 22 जुलै रोजी चांद्रयान-2 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्र येथे लॉन्च करण्यात आलं होतं. Chandrayaan 2 | विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे यांची चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणाबद्दल माहिती | ABP Majha चांद्रयान 2 चे तीन भाग चांद्रयान 2 ला तीन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग ऑर्बिटर आहे, जो चंद्राच्या कक्षेत राहिल. दुसरा भाग लॅण्डर ज्याचं नाव आहे विक्रम, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तर तिसरा भाग आहे प्रग्यान जो रोव्हर असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत राहिल. चांद्रयान 2 मोहिमेची वैशिष्ट्ये काय?Take a look at the first Moon image captured by #Chandrayaan2 #VikramLander taken at a height of about 2650 km from Lunar surface on August 21, 2019. Mare Orientale basin and Apollo craters are identified in the picture.#ISRO pic.twitter.com/ZEoLnSlATQ
— ISRO (@isro) August 22, 2019
-
- चांद्रयान तब्बल 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतर पार करुन चंद्रावर पोहोचणार
- चंद्रावर पोहचण्यासाठी चांद्रयान 2 ला 55 दिवसांचा कालावधी लागणार
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोवर प्रज्ञान उतरेल
- चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान चंद्रावरची माहिती कंट्रोल सेंटरला पाठणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement